नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून तिसरी लाट आल्याचंही म्हटलं जात आहे. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात १ लाख १७ हजार १०० इतके नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३० हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो ७.७४ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात ३ लाख ७१ हजार ३६३ सक्रीय रुग्ण आहेत. लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून आतापर्यंत १४९ कोटी ६६ लाख डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. राज्यातील २७ राज्यात ओमिक्रॉन पोहोचला आहे. एकूण ओमिक्रॉन बाधितांपैकी ११९९ जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
अमेरिकेला पुन्हा फटका
भारतात कोरोना रुग्णांची संख्या आज एक लाखांच्या वर गेली तर जगभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे २५ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत दिवसभरात ७ लाख नवे रुग्ण आढळले असून १८०० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात फ्रान्समध्ये ३ लाख ३२ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गुरुवारी दिवसभरात ब्रिटनमध्ये २ लाख ४९ हजार नवे रुग्ण सापडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.