Corona Update : केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ! कर्नाटकात सरकारचा ज्येष्ठांना मास्क घालण्याचा सल्ला

देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
Coronavirus
Coronavirus
Updated on

देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमिवर देशातील इतर राज्यांकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यादरम्यान कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोमवारी ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्यांनी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. केरळ आणि इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांनी हा सल्ला दिला आहे.

कर्नाटकातील कोडागु येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही काल एक बैठक घेतली. जिथे आम्ही काय पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली. आम्ही लवकरच एक अॅडव्हायजरी जारी करू असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे, त्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे.

तसेच आम्ही सरकारी रुग्णालयांना तयार राहण्यास सांगितले आहे. केरळच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. मंगलोर, चमनाजनगर आणि कोडागु येथे सतर्कता बाळकण्याची आवश्यक आहे. चाचण्यांची संख्या देखील वाढवली जाईल. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी अनिवार्यपणे चाचण्या कराव्यात, असेही त्यांनी सांगितलं.

Coronavirus
Dharavi Redevelopment Project : 'आजच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?' राज ठाकरेंचा मविआ नेत्यांवर घणाघाती आरोप

भारतात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्या किती?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सोमवारी 1,828 वर पोहोचली आहेत. तर केरळमध्ये एक मृत्यू नोंदवला गेला असून येथे कोरोनाचा सब व्हेरियंज JN.1 नुकताच आढळला होता,

सध्या कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.46 कोटी (4,44,69,931) झाली आहे. देशातील रिकव्हरी रेट 98.81 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोनामुळे आतापर्यंत 5,33,317 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे

Coronavirus
MLA Disqualification : ...तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल; सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने मांडला अत्यंत महत्वाचा मुद्दा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.