पुढील चार महिन्यांत कोट्यावधी कोरोना लसी होतील नष्ट, कारण...

कोट्यावधी कोरोना लसी होतील नष्ट
Corona Vaccine News
Corona Vaccine Newsesakal
Updated on

कोरोना महामारी बरोबरची लढाई अद्याप संपलेली नाही. भारतात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोविड-१९ चे दररोजची रुग्णसंख्या एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक झाली आहे. अचानक वाढलेल्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण मोहिमही सुरु आहे. लोकांना बूस्टर डोसही दिली जात आहे. मात्र याच दरम्यान कोविडच्या (Covid) लसींचा वापर करण्याचा कालावधी कमी होणे आणि मागणी घटल्याने लसींच्या कोट्यावधी मात्रा तीन ते चार महिन्यांमध्ये एक्सपायर किंवा निरुपयोगी होणार आहे. (Corona Vaccine Expiry Millions Of Doses Of Vaccine In The Next Three Months)

Corona Vaccine News
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

कंपन्या दवाखान्यांशी साधतायत संपर्क

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेक सारख्या कंपन्या आपला साठा विकण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासगी दवाखान्यांशी सक्रियपणे कार्य करित आहेत. कंपनी मुदत संपलेल्या लसींऐवजी दुसरी लस देऊन साठा खपवण्यास मदत करत आहे. मात्र कोव्हॅक्सिनच्या किती लसींचा कालावधी संपणार आहे हे स्पष्ट झालेले नाही. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाजवळ (Serum Institute Of India) कोव्हिशील्डची जवळपास २० कोटी लसी आहेत. ज्या डिसेंबरमध्ये बनवल्या गेल्या होत्या, त्या सप्टेंबरमध्ये एक्सपायर (मुदत) होतील. जर कंपनीने या मात्रा खपवण्याचे योजना यशस्वी न झाल्यास ती नष्ट करावी लागेल. मात्र सीरमकडून याबाबत अद्याप पुष्टी मिळालेली नाही. गेल्या महिन्यात पार पडलेल्या दावोसमधील जागतिक आर्थिक मंचाला संबोधित करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अदर पुनावाला यांनी संकेत दिले होते, की कंपनीचे कमीत-कमी २० कोटी मात्रा नष्ट होतील. कंपनीला ती नष्ट करावे लागेल, कारण त्यांची मुदत या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये संपत आहे. कोव्हॅक्सिनची मुदत १२ महिन्यांची असते. दुसरीकडे कोव्हिशील्ड नऊ महिन्यांमध्ये मुदत संपते. भारतात लसीकरणात (Corona Vaccination) जवळपास ८० टक्के कोव्हिशील्डची लस दिली जाते.

Corona Vaccine News
तीन तासांनंतर राहुल गांधी ईडी कार्यलयाबाहेर; स्मृती इराणींचा मोठा आरोप

राज्य आणि कंपनीजवळ आहेत कोट्यावधी मात्रा

आरोग्य मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की सीरम इतक्या मात्रा नष्ट करण्यापूर्वी ती मोफत उपलब्ध करुन देणे अथवा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात वापर करण्यासाठी मंत्रालयाशीही संपर्क साधला नाही. सीरमने डिसेंबरपासून उत्पादन थांबवले होते. कारण २५ कोटी मात्रांचा साठा पूर्वीच तयार झाला होता. त्यांच्याजवळ जवळपास २० ते २५ कोटी मात्रा आहेत. त्यानंतर कंपनीने निर्यात, आंतरराष्ट्रीय करार आणि भारतात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राला पुरवठा कराराच्या माध्यमातून आपला काही साठा विकते.

Corona Vaccine News
मतदान करायचे असेल, तर नवीन याचिका करा; मुंबई HC च्या मलिकांना सूचना

गेल्या वर्षी इतकी मात्रा नष्ट

जागतिक आरोग्य विश्लेषण कंपनी एअर फिनिटीनुसार गेल्या वर्षी जी-७ देशांमध्ये कोविड लसीचे जवळपास २४.१ कोटींची मात्र मुदत संपल्याने खराब झाली होती. एअरफिनिटीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपल्या अहवालात म्हटले होते, की लवकर लसींचे वितरण केले नाही, तर २०२१च्या शेवटी जी-७ देशांना २४.१ कोटींची मात्र नष्ट करावी लागू शकते. या वर्षी एकट्या भारतात २० कोटींपेक्षा अधिक मात्रा खराब होण्याची शक्यता आहे. कारण त्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. जर कोविड लसींची मागणी कमी झाली तर त्यांचे वितरण वेगाने केले जाऊ शकत नाही. कोविड लसींची मुदत ही उत्पादक कंपन्यांसाठी आव्हान असेल. गेल्या वर्षी मे महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते, की कोणत्याही लसीची मुदत संपल्यानंतर त्याचा वापर केला जाऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()