दोन्ही कोराना लशी सुरक्षित, अफवांपासून सावध राहा; PM मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

pm modi main.jpg
pm modi main.jpg
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात कोरोना लसीकरणाच्या अभियानास सुरुवात केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी या महाअभियानाची सुरुवात केली. त्यांनी यावेळी देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भारताने कमी वेळात दोन-दोन लशींची निर्मिती केल्याचे सांगितले. भारताच्या दृष्टीने हे मोठे यश असल्याचे सांगत देशवासियांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

1. आजच्या दिवसाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील प्रत्येक घरातील मुलं, वयोवृद्ध, युवक या सर्वांना कोरोनावरील लस कधी येणार असा प्रश्न पडला होता. आता काही क्षणात भारतात जगातील सर्वात मोठ्या लसीकरणास सुरुवात होत आहे. मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.

2. भारताचे लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. ज्याला सर्वाधिक गरज आहे, त्याला सर्वात आधी लस दिली जाईल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की कोरोनावरील लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये सुमारे एक महिन्याचे अंतर ठेवण्यात येईल. दुसरा डोस दिल्यानंतर 2 आठवड्यानंतर तुमच्या शरीरात कोरोनाविरुद्धची आवश्यक शक्ती विकसित होईल. 

3. इतिहासात इतक्या मोठ्या स्वरुपाचे लसीकरण अभियान कधी झाले नाही. जगातील 100 हून अधिक असे देश आहेत, ज्यांची लोकसंख्या 3 कोटींपेक्षा कमी आहे आणि भारताने आपल्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांचे लसीकरण करत आहे. दुसऱ्या टप्प्यात आम्ही ही संख्या 30 कोटींपर्यंत नेऊ इच्छितो. जे वयोवृद्ध आहेत, गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्यांना या टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करु शकता. 30 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहेत. त्यात स्वतः भारत, चीन आणि अमेरिकेचा समावेश आहे. 

4. आपले शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ जेव्हा दोघेही मेड इन इंडिया लशीची सुरक्षा आणि प्रभावावरुन आश्वस्त झाले. तेव्हाच त्यांनी याच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली. त्यामुळे देशवासियांना कोणत्याही पद्धतीचा अप्रचार, अफवा आणि दुष्प्रचारापासून सावध राहिले पाहिजे. 

5. कोरोनाशी आपले युद्ध हे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर राहिली. या कठीण लढाईत आपल्याला आपला आत्मविश्वास कमजोर करु द्यायचा नाही, हा प्रण प्रत्येक भारतीयांमध्ये दिसला. प्रत्येक भारतीयाला याचा गर्व असेल की, जगभरातील सुमारे 60 टक्के बालकांना ज्या जीवरक्षक लसी दिल्या जातात. त्या सर्व भारतात तयार होतात. 

6. भारतीय लस विदेशी लशीपेक्षा तुलनेने खूप स्वस्त आणि वापरासही अत्यंत सोपी आहे. विदेशातील काही लशी अशा आहेत की, त्यांचा एक डोस 5000 रुपयांपर्यंत आहे आणि त्यांना -70 डिग्रीच्या तापमानात ठेवावे लागते. भारताची लस अशा तंत्रज्ञानाने बनली आहे, जी ट्राइड आणि टेस्टेड आहे. ही लस स्टोरेजपासून ते ट्रान्सपोर्टेशनपर्यंत भारतीय स्थिती आणि परिस्थितीशी अनूकूल आहे. ही लस भारताला कोरोनाविरोधातील लढ्यात निर्णायक विजय मिळवून देईल. 

7. संकट कितीही मोठे असो, देशवासियांनी कधीच आत्मविश्वास गमावला नाही. जेव्हा भारतात कोरोना पोहोचला तेव्हा देशात कोरोना टेस्टिंगची एकही लॅब नव्हती. आम्ही आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला आणि आज 2300 हून अधिक नेटवर्क आपल्याकडे आहे. 

8. भारत 24 तास सतर्क राहिला. प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवताना योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. 30 जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला प्रकार समोर आला. परंतु, त्याच्या दोन आठवड्यापूर्वी भारतात एक उच्चस्तरीय समितीची स्थापनाही झाली होती. 

9. 17 जानेवारी 2020 रोजी भारताने आपली पहिला एडव्हायजरी जारी केली आहे. भारत जगातील त्या पहिल्या देशांपैकी होता ज्याने आपल्या विमानतळांवर प्रवाशांचे स्क्रिनिंग सुरु केले होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर चीनने आपल्या नागरिकांना सोडले होते. आपण आपल्या नागरिकांना भारतात आणले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.