डेहराडून (उत्तराखंड): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध अडकून पडले आहेत. शिवाय, लॉकडाऊनमुळे विवाहांवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी विवाह होत आहेत. अशाच एका विवाहाची चर्चा परिसरात रंगली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध भाग, लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर हिरवा, लाल आणि केशरी रंगात विभागले गेले आहेत. उत्तरप्रदेशातील बिजनौर येथील नवरा मुलगा आणि उत्तराखंड मधील नवरी मुलगी यांचा विवाह ठरला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे अडचणी येत होत्या. बिजनौर रेड झोन आहे. यामुळे येथील अरविंद (वय 28) याच्या गावी वधू पक्ष येऊ शकत नव्हता. यामुळे अरविंदने वधूघरी जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला. अरविंदने प्रवासाचा परवाना काढला होता. पण, सीमेवर पोलिसांनी अडविले आणि रेड झोन मधील व्यक्ती दुसऱ्याठिकाणी जाऊ शकत नाही असे सांगितले. बिजनौर पासून वधू छायाचे गाव जसपूर 150 किमीवर असून ते उत्तराखंड मध्ये आहे. पण, तेथे ग्रीन झोन आहे.
अरविंदने वधू्च्या घरी फोन करून पोलिसांनी सीमेवर अडवल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी अरविंदकडे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्याच्या काळात दोन्ही कुटुंबियांमध्ये फोनवरून बोलणे झाले. अखेर, दोन्ही कुटुंबिय बिजनौरच्या सीमेवर आले. पोलिसांनी सीमेवरच दोघांचे लग्न लावून दिले. सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून हा विवाह संपन्न झाला. पोलिसांनी या विवाहाला पूर्ण सहकार्य केले पण नवदांपत्याला आशीर्वादही दिले. या भागात आंतरराज्यीय विवाह नेहमीच होतात. पण, पोलिस चौकीत विवाह होण्याची ही पहिलीच घटना आहे. असे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.