नवी दिल्ली : कोरोना अद्याप संपलेला नाही, असं मोठं विधान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं आहे. त्यामुळं देशात पुन्हा कोरोनाच्या संकट घोंघावत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात सर्व यंत्रणांना अॅलर्ट राहण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Coronavirus alert Corona is not over yet Union Health Minister Mansukh Mandviy big statement)
आरोग्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे बैठकीची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणं पाहता आज आम्ही भारतातील कोरोनाच्या स्थितीचा तज्ज्ञांच्या आणि अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेतला. कोविड अद्याप संपलेला नाही. यावेळी सर्व संबंधितांना अॅलर्ट आणि जागरुकता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

चीनमधील नव्या व्हेरियंटी चर्चा
दरम्यान, बैठकीबाबत नीती आयोगाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, कोरोनाच्या जागतीक परिस्थितीवर आज केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित चर्चा झाली. कोरोनाच्या बाबतीत आपण सतर्क आहोत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या बैठकीत चीनच्या नवीन व्हेरिअटची चर्चा झाली. भारतातील सर्व रुग्णालातील न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी केली जाईल. यासंदर्भात प्रत्येक आठवड्यात बैठक होईल.
हे ही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
लक्षणं असतील तर कोरोना टेस्ट करा. ज्यांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला नसेल तर त्यांनी डोस घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहनही आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.