सातारा : विमल दाेशी या युवकाने कोरोनाला (coronavirus) पराभूत केले आहे पण गेल्या पाच महिन्यांपासून ताे काळ्या बुरशीशी (black fungus) झगडत आहे. काळ्या बुरशीच्या सतत वाढत्या संसर्गामुळे तो त्रस्त आहे. विमलला आतापर्यंत काळ्या बुरशीचे 39 इंजेक्शन्स (injections) देखील देण्यात आली आहेत. कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेत (coronavirus second wave) बरे झालेले रूग्ण, त्यांच्यावरील सर्वात मोठा धोका म्हणजे म्यूकोरमायकोसिस (mucormycosis) म्हणजेच काळी बुरशी. कोरोना प्रकरणांची घटती संख्या असूनही, (coronavirus-black-fungus-rajkot-vimal-doshi-surgery-doctor)
म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. या आजाराने देशातील काही राज्यांमध्ये रुग्णांचा मृत्यू हाेऊ लागला आहे. महाराष्ट्रात बाधितांमध्ये वाढ होत असल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी स्वतंत्र म्युकरमायकोसिसचा कक्ष उभारण्यात आले आहेत.
काळ्या बुरशीच्या वाढत्या प्रकरणांमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यात देखील चिंता वाढली आहे. गुजरातमध्येही काळ्या बुरशीचे रुग्ण सतत वाढत आहेत. राज्यात काळी बुरशीचे एक प्रकरणही समोर आले असून, गेल्या पाच महिन्यांपासून येथील एक युवक बरा होऊ शकलेला नाही.
प्राप्त माहितीनुसार राजकोट येथील युवक विमल दाेशी यास कोरोनाची लागण झाली. विमलने कोरोनावरील उपचार घेतला. अवघ्या काही दिवसांत काेराेनाला हरविले. पण गेल्या पाच महिन्यांपासून विमल काळ्या बुरशीशी झगडत आहे.
काळ्या बुरशीच्या सतत वाढत्या संसर्गामुळे तो त्रस्त आहे. विमलला आतापर्यंत काळ्या बुरशीचे 39 इंजेक्शन्स देखील देण्यात आली आहेत. या पाच महिन्यांत विमलवरही सहा वेळा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता त्याची सातवी शस्त्रक्रिया होणार आहे.
विमलवर उपचार करणार्या डॉक्टर म्हणतात काेविड 19 नंतर त्याला काळ्या बुरशीचा संसर्ग झाला होता. आत्ता त्यांचे जगणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही. विमलच्या आतापर्यंत सहा मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.
मूळचे अहमदाबादचे असलेल्या विमलची पत्नी चांदनी म्हणते काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे तो गेल्या पाच महिन्यांपासून आनंद या गावातच वास्तव्यास आहेत. विमलच्या आतापर्यंतच्या उपचारांमध्ये त्याच्या आयुष्याची पुंजी संपली आहे. उपचारासाठी संपूर्ण रक्कम गोळा झाली असली तरी तिला घर विकावे लागले. आतापर्यंत जवळपास 41 लाख रूपयांचा खर्च उपचारांवर करण्यात आले असून अद्याप त्यांना सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांची गरज आहे.
आतापर्यंत चार लॅपरोस्कोपी, कपाळावरील शस्त्रक्रिया आणि मेंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. ते बरे झालेत असा आमचा समज झाला हाेता परंतु आता त्याच्या मेंदूत काळी बुरशी आढळली आहे.
नाकाभोवती आणि त्याच्या सभोवताल पुन्हा शस्त्रक्रिया केली गेली आणि आता काळ्या बुरशीचे संक्रमण मेंदूत पोहोचले आहे, यामुळे आता मेंदूची न्यूरो शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ताे लवकर बरा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चांदनीने स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.