देशात २४ तासात कोरोनाचे २७ हजार ४०९ नवे रुग्ण; 347 मृत्यू

२४ तासात देशात २७ हजार ४०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येत १९.६ टक्के इतकी घट झाली
Corona
Corona Sakal
Updated on

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून ही बाब दिलासा देणारी आहे. गेल्या २४ तासात देशात २७ हजार ४०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येत १९.६ टक्के इतकी घट झाली आहे. यासोबतच देशात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी २६ लाख ६५ हजार ५३४ इतकी झाली आहे.

याआधी देशात ३१ डिसेंबर २०२१ रोजी कोरोनाचे २२ हजार ७७५ रुग्ण आढळले होते. तर १ जानेवारी २०२२ रोजी २७ हजार ५५३ रुग्णांची नोंद झाली होती.गेल्या २४ तासात भारतात ३४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे एकूण ५ लाख ९ हजार ३५८ जणांनी प्राण गमावले आहेत. आजच्या मृतांच्या आकडेवारीत एकट्या केरळचे ६१ जण आहेत.

Corona
SSC, HSC Exam : पेपरसाठी साडेतीन तास वेळ, परीक्षा त्यांच्याच शाळेत

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्याही कमी होत आहे. देशात ४ लाख २३ हजार १२७ जण कोरोनावर उपचार घेत आहे. सक्रीय रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.९९ टक्के इतकी आहे. तर रिकव्हरी रेट ९७.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ७५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दुप्पट कोरोनामुक्तांची संख्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.