India Coronavirus Update: पुन्हा धोका वाढतोय! देशात 24 तासांत कोरोना संसर्गाचे विक्रमी रुग्ण आढळले

देशभरात कोरोना संसर्गानं (Coronavirus) पुन्हा एकदा जोर पकडलाय.
India Coronavirus Update
India Coronavirus UpdateSakal
Updated on
Summary

महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनानं थैमान माजवायला सुरुवात केली असून तिघांचा बळी घेतला आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्गानं (Coronavirus) पुन्हा एकदा जोर पकडलाय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.

आता पुन्हा एकदा भारतात कोरोना विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत.(Latest Marathi News)

India Coronavirus Update
VIDEO : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असणाऱ्या नेत्यानं रॅलीत उडवल्या 500 रुपयाच्या नोटा; गोळा करण्यासाठी धावाधाव

आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) सांगितलं की, देशभरात कोरोनाची एकूण 2,151 प्रकरणं नोंदली गेली आहेत. गेल्या 24 तासांत पाच महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 1,222 लोक बरे झाले आहेत. कोविडची सक्रिय प्रकरणं आता 11,903 झाली आहेत. यापूर्वी, काल म्हणजेच मंगळवारी देशात 1,573 कोरोना रुग्ण आढळले होते.

India Coronavirus Update
Politics : कर्नाटक विधानसभेच्या जागांचं सध्याचं गणित काय, कोणाकडं किती आहेत जागा? जाणून घ्या

महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनानं थैमान माजवायला सुरुवात केली असून तिघांचा बळी घेतला आहे. तर, उत्तर प्रदेशात गेल्या 11 दिवसांत कोरोनाचे रुग्ण चार पटीनं वाढले आहेत.

24 तासांत इथं कोरोनाचे 74 नवीन रुग्ण आढळले. गाझियाबादमध्ये सर्वाधिक 20, गौतम बुद्ध नगरमध्ये 19, लखीमपूरमध्ये चार आणि लखनऊमध्ये आठ रुग्ण आढळले आहेत. सक्रिय प्रकरणं आता 304 पर्यंत वाढली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.