नवी दिल्ली : सरसकट लॉकडाउन न लावता देखील कोरोना नियंत्रणात ठेवता येते हे अनेक राज्यांमध्ये दिसले आहे. देशातील एकूण रूग्णसंख्येच्या तब्बल ८० टक्के रूग्ण असणाऱ्या महाराष्ट्रासह ६ राज्यांनी ज्या भागात अधिक रुग्णवाढ आहे, तेथे कडकपणे नियमांची अंमलबजावणी करावी व ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष द्यावे तसेच तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुलांची काळजी घ्यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केरळ, ओडिशा, तमिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश या सर्वाधिक रूग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोनापासून वाचण्यासाठी टेस्ट, ट्रैक, ट्रीट व टीका (लसीकरण) हीच रणनीती यापुढे राबवावी लागेल. मायक्रो कंटेन्टमेंट विभागांवर विशेष लक्ष देतानाच ज्या जिल्ह्यांत रूग्णवाढ अधिक आहे तेथे सक्तीने नियम लागू करण्यावर द्यावे लागेल. तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञ वारंवार देत आहेत. या सहा राज्यांनी आधीपासून सक्रिय होऊन तिसऱ्या लाटेची आशंका रोखण्यास पुढाकार घेतला पाहिजे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एखाद्या भागात दीर्घकाळ कोरोना रूग्ण आढळत असतील तर तेथे हा विषाणू रूप बदलण्याचा धोका जास्त असतो.
ग्रामीण भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. तिसऱ्या लाटेची आशंका वारंवार व्यक्त होत आहे, अशा काळात सतत सावध राहावे लागणार आहे. कोरोना आपल्यातून गेलेला नाही. विशेषतः ६ राज्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र व केरळमध्ये सतत रूग्ण वाढत जाणे हे चिंताजनक आहे. हे वेळीच रोखले पाहिजे. ऑक्सिजन प्रकल्पांच्या देखरेखीसाठी एका अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे नियुक्ती करावी. युरोप व अमेरिकेत पुन्हा रूग्णसंख्या फार वेगाने वाढत आहे. शेजारचा बांगलादेश व थायलंडमध्ये देखील रूग्ण वाढत आहेत. आम्ही या देशांतील हाहा:कारापासून वेळीच धडा घेतला पाहिजे. दुसऱ्या लाटेचा अनुभव आपल्याजवळ आहे.
आदित्यनाथ सरकारचे कौतुक
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केलेल्या कामाची मोदी यांनी स्तुती केली. ते म्हणाले, की ‘४ टी’ चा मंत्र उत्तर प्रदेश सरकारने अमलात आणला. राज्यात ५ कोटी ७० लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत व दर दिवशी चाचण्यांची क्षमता राज्याने दीड लाखांपर्यंत वाढवली आहे. अलीकडे झालेल्या जिल्हा परिषद व ब्लॉक निवडणुकांत उत्तर प्रदेशातील जनतेने सप, बसप या पक्षांना घरी बसविले आहे व भाजपला काम करण्याची जबाबदारी पुन्हा दिली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
मोदींच्या सूचना
रुग्णवाढ होत असलेल्या भागांकडे लक्ष द्या
तिसऱ्या लाटेमुळे मुलांनाही जपावे लागेल
रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यांत नियम कठोर करा
ऑक्सिजन प्रकल्पांसाठी स्वतंत्र अधिकारी नेमा
युरोप अमेरिकेपासून आपण शिकायला हवे
यूपीचा ‘४-टी’चा फॉर्म्युला सगळ्यांनी अवलंबावा
टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट या त्रिसूत्रीचा वापर करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.