'लॉकडाउन ५.०'चा प्लॅन तयार; 'या' ११ शहरांवर असणार विशेष लक्ष्य!

Corona-Lockdown
Corona-Lockdown
Updated on

नवी दिल्ली : कोरोना महामारीने देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून देशात रुग्णांचा आकडा 1.51 लाखांच्या पार गेला आहे. त्यातच लॉकडाउनचे चौथे सत्र 31 मे रोजी संपणार असल्याने केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नवीन योजना तयार करत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात लागू करण्यात येणारा पुढील लॉकडाउन हा थोडा वेगळा असणार आहे. कारण या लॉकडाउनमध्ये ११ शहरांवर सरकारचे लक्ष्य असणार आहे. या अकरा शहरांमध्ये कोरोना बाधितांच्या एकूण रुग्णसंख्येपैकी 70 टक्के कोरोनारुग्ण राहत आहेत. त्यामुळे या शहरांना डोळ्यासमोर ठेवत कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे.

११ शहरे जेथे आहेत ७० टक्के कोरोनाबाधित रुग्ण :

१. दिल्ली
२. मुंबई
३. बेंगलुरू 
४. पुणे
५. ठाणे
६. इंदूर
७. चेन्नई
८. अहमदाबाद
९. जयपूर
१०. सुरत
११. कोलकाता

लॉकडाउनच्या पुढील टप्प्यात या ११ शहरांमध्ये कडक निर्बंध राबवण्यात येणार आहेत. जेणेकरुन या शहरातून कोविडचा होणारा प्रसार रोखला जाणार आहे. तसेच देशातील इतर भागात टप्प्याटप्प्याने उद्योग-व्यवसाय सुरू केले जाणार आहेत. या ११ शहरांपैकी ५ शहरे ही अतिमहत्त्वाची असून या पाच शहरात एकूण बाधितांच्या ६० टक्के कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

५ शहरे जेथे आहेत ६० टक्के कोरोना रुग्ण :

१. अहमदाबाद
२. दिल्ली
३. पुणे
४. कोलकाता
५. मुंबई 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज ६ हजारांच्या पुढेच नोंदवली जात आहे. त्यामुळे देशाची स्थिती गंभीर बनली आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही 4300 च्या पुढे गेला आहे. तसेच देशातील काही भागांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा अजूनही वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने जगातील १० सर्वाधिक कोरोनाबाधित देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

दरम्यान, देशाने सलग चार लॉकडाउन अनुभवले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी लॉकडाउन पुन्हा देशभर राबवणे कठीण आहे. लॉकडॉउनमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तसेच नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार लॉकडाउन उठवण्याची शक्यता असून रेड झोनमध्येच कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.