बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी जमले तीन हजार नागरिक अन्...

coronavirus lockdown thousands people attended bull funeral in madurai
coronavirus lockdown thousands people attended bull funeral in madurai
Updated on

मदूराई (तमिळनाडू): एका बैलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल तीन हजाराहून अधिक नागरिक जमले. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे माहिती समजल्यानंतर  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्याला आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. शिवाय, सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितले. पण, अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 12,000 च्या वर गेला असून, आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जिल्हाधिकारी टी. जी. विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदुराईतील एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी 12 एप्रिल रोजी हजारो नागरिक उपस्थित होते. याप्रकरणी लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या तब्बल 3 हजार नागरिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत सुमारे दोन लाख गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दीड लाखाहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. मास्क न घालता बाहेर पडणाऱ्यांना 100 रुपये दंड आकारला जात असन, वाहनचालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.