coronavirus in india, covid-19, latest updates : मागील 24 तासांत कोरोनाचे 39 हजार 97 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 35 हजार 87 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 546 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनामुक्त रुग्णापेक्षा नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्याही वाढली आहे. मागील 24 तासांत देशात 3,831 उपचाराधीन रुग्ण वाढले आहेत. सध्या देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाख 8 हजार 977 इतकी झाली आहे.
देशातील सध्याची स्थिती -
एकूण रुग्ण Total cases: 3,13,32,159
एकूण कोरोनामुक्त Total recoveries: 3,05,03,166
उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,08,977
एकूण मृत्यू Death toll: 4,20,016
एकूण लसीकरण Total vaccination: 42,78,82,261
देशाचा रिकव्हरी रेट 97.35 टक्के इतका झाला आहे. आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्केंपेक्षा कमीच आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.22 इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.40 टक्के इतका झाला आहे. सलग 33 दिवस दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्केंपेक्षा कमी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.