ढिलाई नको! ४४ जिल्ह्यांत १० टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्हीटी रेट

ढिलाई नको! ४४ जिल्ह्यांत १० टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्हीटी रेट
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज देशातील कोरोना आकडेवारीसंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटलंय की, देशात सध्या ४४ असे जिल्हे आहेत, जिथे कोरोना व्हायरसचा पॉझिटीव्हीटी रेट हा १० टक्क्यांहून अधिक आहे. केरळ, मणिपूर, मिझोराम, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या यामध्ये समावेश आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, सहा राज्यांतील १८ जिल्हे असे आहेत, जिथे गेल्या चार आठवड्यांमधअये कोरोनाच्या संसर्गामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, मणिपूर इत्यादी राज्ये सामील आहेत. या १८ जिल्ह्यांमध्ये एकूण प्रकरणांपैकी ४७.५ टक्के प्रकरणे आहेत.

ढिलाई नको! ४४ जिल्ह्यांत १० टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्हीटी रेट
'पेगॅसस'चं सत्य बाहेर येणार? सुप्रीम कोर्टात येत्या ५ ऑगस्टला सुणावणी

अग्रवाल यांनी पुढे म्हटलंय की, देशातील २२२ जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमण कमी झाले आहे. एक जून रोजी देशात २७९ जिल्हे असे होते ज्या ठिकाणी १०० हून अधिक प्रकरणे दिसून येत होती. मात्र, आता अशा जिल्ह्यांची संख्या कमी होऊन केवळ ५७ जिल्हे राहिले आहेत.

ढिलाई नको! ४४ जिल्ह्यांत १० टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्हीटी रेट
'हा संविधानाचा अपमान'; संसदेतील विरोधकांच्या गदारोळावर PM मोदी नाराज

आतापर्यंत ४७.८५ कोटी लस

कोरोना महासंकटाच्या विरोधातील लढ्यासाठी लसीकरण अभियान सुरु आहे. या लसीकरणाची माहिती देताना अग्रवाल यांनी म्हटलंय की, देशात आतापर्यंय कोरोनाप्रतिबंधक लसीच्या ४७.८५ कोटी डोस दिले गेले आहेत. यामध्ये ३७.३६ कोटी पहिला डोस तर १०.५९ कोटी दुसरा डोस दिला गेला आहे.

लव अग्रवाल यांनी म्हटलंय की, मे महिन्यात लसीच्या १९.६ लाख डोस दिले गेले होते. जुलै महिन्यामध्ये ही संख्या ४३.४१ लाख राहिली. त्यांनी म्हटलंय की, देशात जुलै महिन्यात जेवढे डोस दिले गेले, ती संख्या मे महिन्यातील लसीकरणाच्या चौपट आहे. अशी काही राज्ये आहेत, ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस विरोधी लसीच्या तीन कोटींहून अधिक डोसची पूर्तता केली गेली आहे. उत्तर प्रदेशला ४.८८ कोटी, महाराष्ट्राला ४.५ कोटी आणि गुजरातला ३.४ कोटी डोस दिले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.