Karnataka News : लग्नासाठी वधूने मेकअप केला अन् थेट ICU मध्येच दाखल करावं लागलं; असं काय झालं?

या प्रकरणी ब्युटिशियनला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Bride
BrideSakal
Updated on

कर्नाटकात एका ब्युटिशियनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिच्याकडून मेकअप करून घेतल्यानंतर वधूला अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मेकअपनंतर वधूचा चेहरा विद्रूप झाला आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं लग्न होतं. त्यासाठी तिने ब्युटिशियनकडून मेकअप करून घेतला होता. मात्र मेकअपनंतर तिचा चेहरा अचानक सुजला, कुरुप आणि विद्रूप दिसू लागला. यानंतर या वधूला थेट रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल करावं लागलं. या वधूचं लग्नही पुढं ढकलण्यात आलं आहे.

Bride
G20 in India : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला रिक्षा प्रवासाचा आनंद; 'चाय पे चर्चा'ही केली

ब्युटीशियनने पीडितेला सांगितले होते की तिने नवीन प्रकारचा मेकअप केला आहे आणि तिच्या चेहऱ्यावर लावला आहे. यानंतर पीडितेला ऍलर्जी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

कॉस्मेटिक दुखापतीची ही पहिली घटना नक्कीच नाही. क्लिनिकल पेडियाट्रिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार 2002 ते 2016 या कालावधीत युनायटेड स्टेट्समधील 64,000 हून अधिक मुलांना कॉस्मेटिक-संबंधित इजा झाली होती. अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की सौंदर्यप्रसाधनांचा वापर त्यांच्यावरील निर्देशानुसार न केल्यास गंभीर दुखापत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.