भारताचा 'चहा' अनेक देशांनी केला परत, किटकनाशकांचे प्रमाण अधिक

भारताचा 'चहा' अनेक देशांनी केला परत
Tea
Teaesakal
Updated on

कोलकाता : भारतीय चहा निर्यातदार संघाचे (ITEA) अध्यक्ष अंशुमान कनोरिया यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय आणि देशातील खरेदीदारांनी किटनाशके आणि रसायने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याने चहाच्या (Tea) बॅचस् ची एक मालिका परत केली आहे. जागतिक चहा बाजारात श्रीलंकेची स्थिती अस्थिर झाल्याने भारतीय (India) चहा मंडळ निर्यात वाढवण्यावर विचार करित आहे. मात्र बॅचस् परत केल्याने बाहेरील शिपमेंटमध्ये घसरण होत आहे. (Countries Send Back Indian Tea, Says High Pesticides)

Tea
मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मविआ'च्या नेत्यांची घेतली बैठक, राज्यसभेसाठी खलबते

एफएसएसएआय मापदंडात अनेकांना हवीय सूट

'पीटीआय'शी बोलताना कनोरिया म्हणाले, की देशात विकली जाणारी सर्व चहा भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) मापदंडानुसार व्हायला हवी. मात्र बहुतेक खरेदीदार चहा खरेदी करित आहे. त्यात रासायनिक अंश असामान्यापेक्षा जास्त आहे. कायद्याचे पालन करण्याऐवजी अनेक जण एफएसएसएआय मानके अधिक शिथिल करण्याचा आग्रह करित आहेत. मात्र हा एक चुकीचा पायंडा पडू शकतो, असे कनोरिया म्हणाले. (Tea Export)

Tea
टेस्ला करणार १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात, सर्व नोकरभरती थांबवणार?

मंडळाचे लक्ष्य ३० कोटी किलोचे

अनेक देश चहासाठी कडक नियमांचे पालन करित आहेत. बहुतेक देश युरोपियन संघाचे मानकांचे पालन करतात. ती एफएसएएसआयपेक्षा अधिक कठोर आहेत, असे कनोरिया म्हणाले. २०२१ मध्ये भारताने १९५.९० मिलियन किलोग्रॅम चहाचे निर्यात केले. प्रमुख खरेदीदार राष्ट्रमंडळ (CIS) देश आणि इराण होते. मंडळाचे या वर्षीचे ३० कोटी किलोग्रॅम चहाचे निर्यातीचे लक्ष्य गाठण्याचे आहे. भारताने २०२१ मध्ये ५,२४६.८९ कोटी रुपयांचे चहाची निर्यात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.