"देशानं आता गांधी कुटुंबावरही टीका करण्याची हिंमत बाळगायला हवी"

राहुल गांधींवर टीका केल्यानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टिकेला सर्मा यांनी उत्तर दिलंय
CM H. B. Sarma
CM H. B. Sarmae sakal
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा (CM Himanta Biswa Sarma) यांच्यावर चहूबाजुंनी टीका होत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी देखील सर्मा यांच्यावर याप्रकरणी सडकून टिका करताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. आता त्यांच्या या टिप्पणीवर सर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना देशानं आता गांधी कुटुंबावरही टीका करण्याची हिंमत बाळगावी असं म्हटलं आहे. (country should now have courage to criticize Gandhi family too says CM Himanta Sarma)

मुख्यमंत्री सर्मा म्हणाले, "एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लष्कराचा अपमान करणं किंवा त्यांच्याकडे सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावा मागणं यापेक्षा मोठा गुन्हा कोणताच असू शकत नाही. राहुल गांधींच्या या वागण्यावर मी त्यांना काही बोललो तर तेलंगणाचे मुख्यमंत्री भडकले. पण जेव्हा राहुल गांधी लष्कराबाबत बोलले होते तेव्हा हे लोक का पेटून उठले नाहीत. या लोकांनी का ट्विट केलं नाही"

CM H. B. Sarma
प्रचाराची वेळ वाढली; निवडणूक आयोगानं 'या' अटींवर दिली परवानगी

"गांधी कुटुंबाला तुम्ही काही बोलू शकत नाही पण बाकी सर्वकाही करता येतं, हे ही मानसिकता देशातून जायला हवी. देशाला लोकशाहीवादी व्हावं लागेल, गांधी कुटुंबियांवर देखील टीका करण्याची हिंमत आता देशाला बाळगायला हवी. गांधी कुटुंबानं खुलेपणानं लष्करावर टीका केली, दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्यावरही टीका केली. पण या कुटुंबाला कोणी जबाबदार धरलं नाही. पण भारत आता बदलला आहे आणि इथं गांधी कुटुंबही जबाबदारीच्या परिघात आहे. त्यांनाही विविध गोष्टींना जबाबदार धरता यायला हवं," अशा शब्दांत मुख्यमंत्री सर्मा यांनी गांधी कुटुंबावर पुन्हा एकदा शरसंधान साधलं.

CM H. B. Sarma
Podcast : ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलता येणार ते रिया चक्रवर्तीचं दोन वर्षांनंतर कमबॅक!

सर्मा यांनी राहुल गांधींवर काय केली होती टीका?

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराने पठाणकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबतचा पुरावा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री सर्मा यांनी प्रत्युत्तर देताना अगदी खालच्या पातळीवरील टीका केली होती. सर्मा यांनी म्हटलं होतं की, "भाजपने राहुल गांधी यांच्याकडे ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे चिरंजीव असल्याचा पुरावा कधी मागितला आहे का? दरम्यान, सर्मा यांच्या या विधानानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.