...तर भारतात गुंतवणूक कोण करणार? कोर्टानं CBI ला फटकारलं

Court on NSE Scam
Court on NSE ScamSakal
Updated on

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE Scam) घोटाळ्याबाबत न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून सीबीआयला फटाकरले आहे. देशाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमची विश्वासार्हता धोक्यात आली. असे घोटाळे झाले तर भारतात गुंतवणूक कोण करणार? असा सवाल विशेष न्यायमूर्तींनी सीबीआयला (CBI) विचारला आहे.

Court on NSE Scam
NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना 7 दिवसांची CBI कोठडी

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना नुकतीच देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चित्रा यांच्यावर एका 'हिमालयन योगी'च्या सल्ल्यानं मोठे निर्णय घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, हिमालयन योगी हे एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम होते. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, ते या प्रकरणात सेबीच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक रवी नारायण यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. एनएसईचे माजी प्रमुख आणि 'हिमालय योगी' यांचा समावेश असलेल्या फेरफार प्रकरणात बाजार नियामक सेबीच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, असंही सीबीआयने न्यायालयात सांगितलं.

चित्रा या 2013 ते 2016 पर्यंत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक होत्या, नंतर त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले. बाजार नियामक सेबीने एक आदेश काढला होता. त्यानुसार एनएसईच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांनी योगींच्या प्रभावाखाली येऊन आनंद सुब्रमण्यम यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसरचे सल्लागार आणि एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले होते, असा खुलासा झाला होता. त्यानंतर चित्रा रामकृष्ण चर्चेत आल्या आहेत. चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांच्याविरोधातील करचोरी प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून आयकर विभागाने मुंबई आणि चेन्नई येथील त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते. दोघांविरुद्ध करचोरी आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करणे आणि पुरावे गोळा करणे हा या कारवाई उद्देश होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.