Baba Ramdev : रामदेवबाबांना न्यायालयाचा दिलासा

योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्याशी संबंधित अवमानना खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. पुढील सुनावणीवेळी वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून न्यायालयाने दोघांनाही सूट दिली आहे.
Baba Ramdev
Baba Ramdevsakal
Updated on

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्याशी संबंधित अवमानना खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. पुढील सुनावणीवेळी वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून न्यायालयाने दोघांनाही सूट दिली आहे.

‘बाबा रामदेव यांचा समाजात खूप प्रभाव आहे, चांगल्या कामासाठी त्यांनी या प्रभावाचा उपयोग करावा,’ अशी टिपणी खंडपीठाने सुनावणीदरम्यान केली. एकीकडे बाबा रामदेव यांना दिलासा देतानाच न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) वाभाडे काढले. ‘

Baba Ramdev
Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

‘आयएमएचे अध्यक्ष आर. व्ही. अशोकन यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे आम्ही नाराज आहोत. याबद्दल तुम्हाला सहजासहजी माफी देता येणार नाही,’’ असे खंडपीठाने नमूद केले. अशोकन यांनी मुलाखत दिल्याबद्दल माफी मागितली होती. यावर तुम्ही माफी मागितली आहे पण ही माफी मान्य करायची का, हा प्रश्न असल्याचे न्या. हिमा कोहली यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.