लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची तयारी सुरु; DCGI चा मोठा निर्णय

कोव्हॅक्सिनच्या २ ते १८ वयोगटातील क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी
covid vaccine
covid vaccineGoogle file photo
Updated on

नवी दिल्ली : भारतात २ ते १८ वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिन लशीच्या (Covaxine Vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीला ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) मंगळवारी मंजुरी दिली. ही क्लिनिकल ट्रायल येत्या १० ते १२ दिवसांमध्ये सुरु होईल, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. (COVAXIN has been approved by DCGI for Phase II & III clinical trials in age group 2-18 years)

भारतात पहिल्यांदाच कोविड-१९ लशीची लहान मुलांवर चाचणी केली जाणार आहे. या ट्रायल्स विविध ठिकाणी केल्या जाणार आहेत. यामध्ये दिल्ली एम्स, पटना एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा समावेश आहे. दरम्यान, DGCI नं सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या (SEC) शिफारसी स्विकारल्या असून हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला २ ते १८ वयोगटातील मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची परवानगी दिली. हा प्रस्ताव भारत बायोटेकला मिळाला असून त्यानुसार आता ५२५ आरोग्यदायी स्वयंसेवकांवर ट्रायल करण्यात येणार आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका

दरम्यान, भारतात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि सरकारनंही वर्तवली आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये भारतीय व्हेरियंटचा लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रासह राज्य सरकारनेही लहान मुलांसाठी बेड आणि इतर आरोग्य सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून लहान मुलांना लसीकरण करुन सुरक्षितता देण्यासाठी ट्रायल्स घेतल्या जात आहेत.

देशात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु

देशात सध्या तीन लस उपलब्ध करुन यामध्ये कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचा समावेश आहे. देशात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.