Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Bharat Biotech: परवाना प्रक्रियेअंतर्गत, 27 हजारांहून अधिक लोकांवर कोवॅक्सिनची चाचणी घेण्यात आली. Covaxin ही एकमेव अँटी-कोरोना लस होती, जिच्या परिणामकारकतेची चाचणी भारतात झाली.
Covaxin Is Safe, Claims Bharat Biotech
Covaxin Is Safe, Claims Bharat BiotechEsakal
Updated on

कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने नुकताच दावा केला की, त्यांची अँटी-कोरोनाव्हायरस Covaxin लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ती घेतल्यास त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

AstraZeneca कंपनीने त्यांच्या Covishield लसीचे साइड इफेक्ट्स असू शकतात अशी कबुली दिल्यानंतर भारत बायोटेकने हा दावा केला आहे. भारतात, लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी Covaxin आणि Covishield या लस देण्यात आल्या होत्या. (Covaxin Is Safe, Claims Bharat Biotech)

भारत बायोटेकने निवेदनात म्हटले आहे की, कोवॅक्सिन बनवताना आमची पहिली प्राथमिकता लोकांच्या सुरक्षिततेला होती आणि दुसरी प्राथमिकता लसीच्या गुणवत्तेला होती.

परवाना प्रक्रियेअंतर्गत, 27 हजारांहून अधिक लोकांवर कोवॅक्सिनची चाचणी घेण्यात आली. भारत सरकारच्या COVID-19 लसीकरण कार्यक्रमात Covaxin ही एकमेव अँटी-कोरोना लस होती, जिच्या परिणामकारकतेची चाचणी भारतात झाली.

Covaxin Is Safe, Claims Bharat Biotech
Fact Check: कोविशील्डची लस घेतलेल्यांना खरंच TTS होतो का? वाचा काय आहे व्हायरल दाव्यामागील सत्य

कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या AstraZeneca कंपनीने ब्रिटीश उच्च न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजात कबूल केले आहे की, कोव्हिशिल्ड या कोरोनाविरोधी लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात.

AstraZeneca कंपनीने केलेल्या या खुलाश्यामुळे कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच याबाबत सर्वत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

लस घेतल्यानंतर थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होण्याचा धोका असतो. तथापि, हे दुर्मिळ प्रकरणांमध्ये घडते, असे कंपनीने न्यायालयाला सांगितले होते.

Covaxin Is Safe, Claims Bharat Biotech
Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

टीटीएसमध्ये मेंदू किंवा इतर रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होते. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. प्लेटलेट्स हे लहान पेशी असतात ज्या रक्त गोठण्यास मदत करतात, म्हणून त्या खूप कमी असणे धोकादायक ठरू शकते. AstraZeneca ची Vaxjavria लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड नावाने तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.