सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यादरम्यान भारत बायोटेकने (Bharat Biotech) गुरुवारी रात्री, त्यांची कोविड लस कोवॅक्सिन (OVAXIN) ही आता प्रौढांसाठी, मुलांसाठी यूनिव्हर्सल लस (Universal Vaccine) बनली आहे, अशी माहिती दिली.
एक निवेदन जारी करत भारत बायोटेकने ही माहिती दिली की, त्यांची कोविड लस कोवॅक्सिन (OVAXIN) ही आता प्रौढ आणि मुलांसाठी यूनिव्हर्सल लस (Universal Vaccine) बनली असून कोरोनाच्या (Corona) विरोधात जागतिक लस विकसित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले आहे आणि परवान्यासाठी सर्व उत्पादनांचा विकास पूर्ण झाले, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोसमध्ये हा ओमिक्रॉन आणि डेल्टाला निष्क्रीय करण्याची क्षमता आहे, असं चाचण्यांमधून दिसून आल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे. लेटेस्ट उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत भारतात प्रशासित केलेल्या एकूण कोविड-१९ लसींपैकी १२ टक्के कोवॅक्सिनचा वाटा आहे. शिवाय, कोवॅक्सिन ही एकमेव कोविड-19 लस आहे जी 15-18 वयोगटातील तरुणांना दिली जाते, ज्यांच्यासाठी लसीकरण कार्यक्रम 3 जानेवारीपासून सुरू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.