कोव्हॅक्सीन देते बिटा आणि डेल्टा व्हेरियंट्सपासून संरक्षण; संशोधनातून दावा

कोव्हॅक्सीन देते बिटा आणि डेल्टा व्हेरियंट्सपासून संरक्षण; संशोधनातून दावा
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या संकटाने धूमाकूळ माजवला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. मात्र, देशात कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंट्सनी थैमान माजवल्यानंतर भीतीचे वातावरण आणखीनच गडद झाले आहे. मात्र, यासंदर्भातील एका अभ्यासाचा अहवाल दिलासा देणारा ठरतोय. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे आणि भारत बायोटेक यांनी तिन्ही संस्थांनी एकत्रित येऊन केलेला हा सर्व्हे आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस बिटा आणि डेल्टा या कोरोनाच्या व्हेरियंट्सवर प्रभावी असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून पुढे आला आहे. यातील डेल्टा (B.1.617.2) हा व्हेरियंट भारतातच सापडला असून तो सध्या भारतात प्रभावी आहे. तर दुसरीकडे साऊथ अफ्रिकेमध्ये बिटा (B.1.351) हा कोरोना व्हेरिंयट पहिल्यांदा आढळला आहे. (Covaxin Offers Protection From Beta Delta Variants Claims Early Study by National Institute of Virology the Indian Council of Medical Research and Bharat Biotech)

कोव्हॅक्सीन देते बिटा आणि डेल्टा व्हेरियंट्सपासून संरक्षण; संशोधनातून दावा
लस घ्या आणि जिंका बंदूक, गांजा आणि बिअर; अमेरिकन लोकांसाठी भन्नाट ऑफर्स

हा स्टडी 20 असे लोक जे कोरोनातून नुकचेत बरे झाले आहेत तर 17 असे लोक ज्यांनी 28 दिवसांनंतर कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांच्या अभ्यासावर आधारित आहे. कोवॅक्सीनने या चिंता वाढवणाऱ्या दोन प्रकारांविरूद्ध संरक्षणात्मक प्रतिसाद दर्शविला आहे, असा दावा या अभ्यासामध्ये करण्यात आला आहे. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव हे या रिपोर्टच्या लेखकांपैकी एक आहेत. तर दुसरा लेखक हा कोव्हॅक्सीन लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकचा आहे. अत्यंत संसर्गजन्य आणि वेगाने पसरणार्‍या या डेल्टा व्हेरियंटमुळेच भारतात कोरोनाच्या दुसर्‍या प्राणघातक लाटेने थैमान माजवले आहे, असं एका सरकारी अभ्यासामध्ये म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या 'अल्फा' व्हेरियंटहूनही हा व्हेरियंट अधिक घातक ठरला आहे. तसेच तो 50 टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. मात्र, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, डेल्टा व्हेरियंटमुळे अधिक मृत्यू अथवा संसर्ग पसरतो आहे, याचा अद्याप कसलाही पुरावा मिळाला नाहीये.

कोव्हॅक्सीन देते बिटा आणि डेल्टा व्हेरियंट्सपासून संरक्षण; संशोधनातून दावा
अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड, बचावासाठी गेलेल्या बॉक्सरची हत्या

अलिकडच्याच आठवड्यांत आलेल्या एका अहवालानुसार सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली कोविशील्ड ही लस कोव्हॅक्सिनहून अधिक प्रमाणात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला होता. हा स्टडी कोरोना व्हायरस व्हॅक्सीन इंड्यूस्ड अँटीबॉडी टायटरने (Coronavirus Vaccine-induced Antibody Titre - COVAT) केला होता. मंगळवारी सरकारने खासगी हॉस्पिटल्ससाठी कोरोना लसींचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार, कोविशील्डच्या प्रति डोससाठी 780 रुपये, कोव्हॅक्सिनच्या प्रति डोससाठी 1,410 रुपये आणि स्पुटनिक लसीच्या प्रति डोससाठी 1,145 रुपये दर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.