मोठी बातमी : कोव्हॅक्सिनचे अमेरिकेत होणार मूल्यांकन; भारत बायोटेकची माहिती

COVAXIN
COVAXINCOVAXIN
Updated on

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन युनायटेड स्टेट्समध्ये (अमेरिका) नागरिकांना देता येणार की नाही, याचे मूल्यांकन केले जाणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी (ता. १९) जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. कोव्हॅक्सिन आमचा क्लिनिकल कार्यक्रम पुढे नेण्यात सक्षम झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की हे पर्यायी कोविड-१९ लसीच्या जवळ घेऊन जाईल, असे डॉ. शंकर मुसुनुरी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.

भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन ही भारतात निर्मित केलेली कोरोना लस आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्सिट्यूट ऑफ वायराॅलाॅजीच्या संयुक्त विद्यमाने या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. या लसीमध्ये कोरोनाच्या मृत पेशींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये रोगाची लक्षणे आढळण्याची शक्यता नाही. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ती लस उपयुक्त आहे, असे भारत बायोटेकचे म्हणणे आहे.

ओक्यूजेनने घोषणा केली की यूएस फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (FDA) कोवॅक्सिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लस BBV152 चे मूल्यांकन करण्यासाठी कंपनीच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह न्यू ड्रग (IND) अर्जावर तपास पूर्ण केला आहे. तसेच क्लिनिकल बंदी उठवण्यात आली आहे. Ocugen संयुक्तपणे अमेरिका आणि कॅनडामध्ये कोविड-19 विरुद्ध कोवॅक्सिन तयार करीत आहे, असे लस निर्माता भारत बायोटेकने सांगितले.

COVAXIN
Russia-Ukraine Crises : रशियाकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

कोव्हॅक्सिनसाठी (Bharat Biotech) आमचा क्लिनिकल कार्यक्रम पुढे नेण्यात सक्षम झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की हे पर्यायी कोविड-१९ लसीच्या जवळ घेऊन जाईल. आमचा ठाम विश्वास आहे की या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकापेक्षा जास्त लसींचा दृष्टिकोन आवश्यक आहे. आम्ही आमच्या लसीचे मूल्यांकन तयार करण्यावर काम करीत आहोत, असे डॉ. शंकर मुसुनुरी, अध्यक्ष, सीईओ आणि सह-संस्थापक, ओक्यूजेन म्हणाले.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन युनायटेड स्टेट्समध्ये (अमेरिका) नागरिकांना देता येणार की नाही, याचे मूल्यांकन केले जाणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी (ता. १९) जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. कोव्हॅक्सिन आमचा क्लिनिकल कार्यक्रम पुढे नेण्यात सक्षम झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की हे पर्यायी कोविड-१९ लसीच्या जवळ घेऊन जाईल, असे डॉ. शंकर मुसुनुरी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.

COVAXIN
उभा ट्रेलर पाहून चालक घाबरला अन् तागडे कुटुंबाला मृत्यूने कवटाळले

दोन कोटींहून अधिक किशोरवयीन मुलांचे लसीकरण

कोरोना महामारीच्या काळात देशात वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली की, भारतात १५ ते १८ वयोगटातील दोन कोटींहून अधिक किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. सरकारच्या कोव्हॅक्सिन (CoWIN) पोर्टलनुसार, आतापर्यंत या वयोगटातील लसींचे एकूण ७,३८,७४,८७६ डोस देण्यात आले आहेत.

१३ देशांमध्ये आपत्कालीन वापर सूची

कोव्हॅक्सिन कोविशील्डनंतर भारतात सर्वाधिक वापरले जाते. सुरुवातीला मान्यता मिळण्यात अडचण होती. परंतु, आता इतर अनेक देशांनीही मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, लसीला १३ देशांमध्ये आपत्कालीन वापर सूची (EUL) देण्यात आली आहे. Occugen युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये कोव्हॅक्सीनच्या निर्मितीमध्ये भागीदार आहे.

COVAXIN
गडकरी म्हणाले, दोन किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता थकून गेलो

क्लिनिकल स्थगिती उठवली

यूएस आरोग्य नियामकने USFDA कोविड-१९ लस उमेदवार BBV152 च्या मूल्यांकनासाठी क्लिनिकल स्थगिती उठवली आहे. युनायटेड स्टेट्स बाहेर, BBV152 ही कोव्हॅक्सिन म्हणून ओळखली जाते. कोव्हॅक्सिन (BBV152) भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सहकार्याने विकसित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.