Biological-E Covid-19 Vaccine : बायोलॉजिकल-ई कंपनीला 30 कोटी कोरोना डोसची ऑर्डर दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी दिली. लस निर्मितीसाठी बायोलॉजिकल-ई कंपनीला 1500 कोटी रुपयांची अॅडव्हान्स (अगाऊ) रक्कम देण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, बायोलॉजिकल-ई कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान 30 कोटी डोस केंद्रासाठी तयार ठेवण्यात येणार आहेत. लस निर्मितीच्या प्रस्तावाला राष्ट्रीय तज्ज्ञांच्या ग्रुपने (NEGVAC) तपासलं असून पुष्टी दिली आहे. सविस्तर जाणून घेऊयात बायोलॉजिकल-ई कंपनीच्या लसीविषयी....
कशापद्धतीची आहे लस? डोसमधील अंतर किती?
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बायोलॉजिकल-ई विकसीत करत असलेली लस RBD प्रोटीन सबयूनिट (Protein subunit ) लस आहे. यामध्ये SARS-CoV-2 चे रिसेप्टर-बायंडिंग डोमेन (RBD) चे डिमेरिक फॉर्मचा अँटीजनप्रमाणे वापर होतो. लसीची क्षमता वाढवण्यासाठी यामध्ये अॅडज्युवेंट CpG 1018 लाही मिसळण्यात आलं आहे. बायोलॉजिकल-ई ही लस दोन डोसमध्ये देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. पुढील काही महिन्यांत ही उपलब्ध होईल.
क्लिनिकल ट्रायलमध्ये परिणाम काय?
क्लिनिकल चाचण्यांमध्ये फेज एक आणि दोनने सकारात्मक परिणाम दर्शवल्यानंतर बायोलॉजिकल-ई कंपनीला 24 एप्रिल रोजी तिसऱ्या क्लिनिकल चाचणीला परवानगी देण्यात आली. सध्या या लसीची तिसरी क्लिनिकल चाचणी सुरु आहे. 1/2 लसीच्या क्लिनिकल ट्रायलला नोव्हेंबर 2020 मध्ये परवानगी दिली होती. 360 जणांवर क्लिनिकल ट्रायल झाली होती. कंपनीनं याबाबतीची कोणतीही माहिती सार्वजनिक केली नव्हती. मात्र, बायोलॉजिकल-ई कंपनीच्या एमडी महिमा डाल्टा म्हणाल्या की, 'लसीच्या क्लिनिकल ट्रायलचे परिणाम सकारात्मक आहेत.' बायोलॉजिकल-ई लसीच्या फेज 3 ची क्लिनिकल ट्रायल देशभरातील 1,268 जणांवर केली जाणार आहे.
किंमत काय? कधीपर्यंत मिळणार?
30 कोटी डोससाठी बायोलॉजिकल-ई कंपनीला केंद्र सरकार 1500 कोटी रुपये देणार आहे. म्हणेजच कंपनीला एका डोससाठी 50 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. खासगी मार्केटमध्ये या लसीची किंमत अद्याप ठरलेली नाही. मात्र जगातील ही सर्वात स्वस्त लस असल्याचं म्हटलं जात आहे. एका रिपोर्ट्सनुसार, बायोलॉजिकल-ई कंपनीच्या या लसीची किंमत 1.5 डॉलर प्रति डोस इतकी आहे. म्हणजे, भारतात या लसीची किंमत 110 रुपये असू शकते. बायोलॉजिकल-ई लसीचं उत्पादन ऑगस्टपासून सुरु होणार आहे. म्हणजे स्पटेंबरपासून ही लस भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते. बायोलॉजिकल-ई लस कधीपर्यंत उपलब्ध होईल, याबाबत सरकारनं अद्याप कोणतेही स्पष्टकरण दिलेलं नाही. फक्त पुढील काही दिवसात ही लस उलपब्ध होईल, असं सांगण्यात आलं.
सध्या कोणती लस उपलब्ध आहे?
देशात सध्या तीन कोरोना लसींना वापरण्यासाठी आपतकालीन मान्यता दिली आहे. जानेवारीमध्ये सीरमच्या Covishield आणि भारत बायोटेकच्या Covaxin या लसींना परवानगी दिली होती. तर रशीयातील Sputnik V या लसीला एप्रिलमध्ये मान्यता दिली होती. या तिन्हीपैकी भारतीयांनी Covishield ला पसंती दर्शवली आहे. लस घेतलेल्यांपैकी जवळपास 90 टक्केंनी Covishield पसंती दर्शवली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.