भारतात 24 तासात 1,088 कोरोना रूग्णांची नोंद तर, 26 मृत्यू

देशात लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 15,05,332 लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोना
कोरोना sakal
Updated on

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 1,088 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, जी कालच्या तुलनेत 36.6 टक्क्यांनी वाढ झाली असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाच्या 796 कोरोना रुग्णांची नोंद आणि 19 जणांचा मृत्यू झाला होता. दैनिक सकारात्मकता 0.25 टक्क्यांवर तर, साप्ताहिक सकारात्मकता दर 0.24 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. सध्या देशात एकूण सक्रिय रूग्णांची संख्या 10,870 आहे. (India Corona Update)

देशात लसीकरण (Corona Vaccination In India ) मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 15,05,332 लसीकरण करण्यात आले असून गेल्या 24 तासांत एकूण 1,86,07,06,499 लसीकरण करण्यात आले आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात 4,29,323 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 79.49 कोटी चाचण्या झाल्या आहेत.

कोरोना
आषाढी पायी वारीचा कार्यक्रम जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

'कोविड नियंत्रणात, पण गेला नाही'

देशात कोविड रुग्णांची संख्या कमी असल्याने अनेक राज्यांनी कोविड निर्बंध जवळजवळ रद्द केले आहेत. काही शहरांमध्ये मास्कची अनिवार्यताही रद्द करण्यात आली आहे. तथापि, कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE (Corona New Variant) चे रूग्ण काही राज्यांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे काहिशी चिंता व्यक्त केली जात आहे. नव्या व्हेरिएंटबाबत आढावा घेण्यासाठी काल आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी आढावा बैठक घेतली. यात त्यांनी नागरिकांना घाबरून न जात काळजी घेण्याचे आवहन केले आहे. तसेच कोरोनाची साथ नियंत्रणात आहे मात्र, अद्याप संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी. सरकरातर्फे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लक्ष केंद्रीत केले जात असल्याचेही मांडविया यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()