नवी अँटिबॉडी थेरपी, 12 तासात कोरोना रुग्ण झाले ठणठणीत

corona
coronaMedia Gallery
Updated on
Summary

कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर सात दिवसांच्या आत गंभीर झालेल्या रुग्णांना ही नवी अँटिबॉडी थेरपी देण्यात आली.

नवी दिल्ली - दिल्लीती सर गंगाराम रुग्णालयात दोन कोरोना रुग्णांवर नव्या अँटिबॉडी थेरपीचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे होऊन 12 तासाच्या आत घरी परतले. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर सात दिवसांच्या आत गंभीर झालेल्या रुग्णांना ही नवी अँटिबॉडी थेरपी देण्यात आली. रुग्णालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. यात सांगण्यात आलं की, पहिला रुग्ण 36 वर्षाचा आरोग्य कर्मचारी होता. त्याला खूप ताप होता. तसंच खोकला, अशक्तपणा आणि ल्युकोपीनियासुद्धा होता. रुग्ण बरा होण्याच्या सहाव्या दिवशी REGCov2 (CASIRIVIMAB आणि IMDEVIMAB चे मिश्रण) देण्यात आले. काही तासातच रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना डिस्चार्जही देण्यात आला.

corona
कोरोनाचा हाहा:कार; दिवसभरात 6 हजार 148 जणांचा मृत्यू

आणखी एक रुग्ण आरके राजदान यांचं वय 80 वर्षे इतकं होतं. त्यांना मधुमेह, हायपरटेन्शनचा त्रास आहे. तसंच ताप आणि खोकलाही होता. त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन हे रुममधील हवेपेक्षा 95 टक्के जास्त होतं. मोनक्लोनल अँटिबॉडी आणि सीटी स्कॅनमध्ये त्यांच्यात सौम्य लक्षणं दिसून आली होती. त्यानाही पाचव्या दिवशी REGCov2 देण्यात आलं. त्यानंतर 12 तासात प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आणि त्यांना घरीही सोडण्यात आलं.

corona
मुलांसाठी गाईडलाईन्स जाहीर; रेमडेसिव्हिर न वापरण्याचा सल्ला

सर गंगाराम रुग्णालयातील डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या वरिष्ठ कन्सल्टंट डॉक्टर पूजा खोसला यांनी सांगितलं की, जर मोनोक्लोनल अँटिबॉडी योग्य वेळी दिल्यास त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो. यामुळे जास्त धोका असलेल्यांमध्ये इतर रुग्णांना दाखल करण्याची वेळ येणार नाही. तसंच कोरोनाचा धोका वाढण्यापासून रोखता येईल. गंभीर रुग्णांना देण्यात येणारी औषधे,ज्यामध्ये स्टेरॉइडसह इतर उपचार करावे लागणार नाहीत. यामुळे म्युकरमायकोसिससारखे आजार आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोकाही टळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.