Corona: धोका वाढला! देशात कोरोना रुग्णांची वाढ; 23,091 पॉझिटीव्ह

देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
corona update Death of two corona patients in satara Masks compulsory in school government offices bank
corona update Death of two corona patients in satara Masks compulsory in school government offices bankesakal
Updated on

देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. 163 दिवसांनंतर एका दिवसात चार हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. बुधवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात 4,435 लोकांना कोरोनाच लागण झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. (Covid-19 News Highlights: 4435 fresh Covid cases in India highest single day rise in 163 days )

महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी चार आणि छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. संसर्गामुळे आतापर्यंत एकूण पाच लाख 30 हजार 916 मृत्यू झाले आहेत. आत्तापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या 23,091 वर पोहचली आहे.

corona update Death of two corona patients in satara Masks compulsory in school government offices bank
Padma Awards : महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्मश्री प्रदान; राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

भारतात सध्या कोरोना व्हायरससोबतच H3N2 चा संसर्गही वाढताना दिसत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर काळजी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.