वाढत्या रुग्णसंख्येची चिंता; केंद्राने वाढवली लागू नियमांची मुदत

Corona patients
Corona patientsesakal
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनामुळे आणखी चिंता वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदु:खी वाढली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार कसल्याही प्रकारची ढिलाई करु इच्छित नाहीये. गृह मंत्रालयाने एका आदेशात म्हटलंय की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी म्हणून कोरोना संदर्भातील सगळे नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू राहतील.

Corona patients
तब्बल 50 टक्क्यांनी वाढलं भाजपचं उत्पन्न; तुमचं किती वाढलं?

केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटलंय की, दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णसंख्येमध्ये गेल्या एका महिन्यात घट दिसून आली आहे. मात्र महाराष्ट्रातील काही असे जिल्हे आहेत जिथे संसर्गामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने म्हटलंय की, देशात लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे, मात्र, त्याची गती आणखी वाढवण्याची गरज आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शनिवारी दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील सगळ्या राज्यांना कोरोना संदर्भातील आवश्यक नियमांचं पालन करण्यास सांगितलंय. कसल्याही प्रकारची ढिलाई केली जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.

Corona patients
प्रताप सरनाईक यांच्यासह चारजणांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

उत्सवाच्या काळात अधिक खबरदारी

येणारे काही महिने हे सण-समारंभाचे असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच स्थानिक पातळीवर कडक प्रतिबंध लागू करण्याचा सल्ला दिला आहे. Test, Track, Treat, Vaccination या सुत्रानुसार, कार्य करण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी येणाऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रतिबंध लागू ठेवण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()