कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनांचे पालन सक्तीने केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यात यश मिळेल.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona Pandemic) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. सध्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत असले तरी मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात हानी पोहचवत असताना आता संशोधकांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट (Corona 3rd wave) ही आणखी विध्वंसक असू शकते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. एका गणितीय सूत्राचा आधार घेत तीन सदस्यीय संशोधकांच्या टीमने हा इशारा दिला आहे. (Covid-19 third wave after 6 months says Govt panel of scientists)
आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक एम. विद्यासागर यांनी म्हटले आहे की, जर देशात लसीकरण मोहिमेला गती आली नाही, तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले गेले नाही, तर धोका आणखी वाढू शकतो. पुढील सहा ते आठ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. सध्या देशातील बहुतेक नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडी) निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी जर लोकांना लस मिळाली नाही, तर नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडी संपुष्टात येऊ लागतील. आणि कोरोना संक्रमणाचा धोका पुन्हा वाढेल.
त्यामुळेच लसीकरण अभियान आणखी वेगाने होणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनांचे पालन सक्तीने केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यात यश मिळेल. जर याकडे दुर्लक्ष केलं तर पुढील सहा ते आठ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याला कुणीही रोखू शकणार नाही.
दरम्यान, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी याआधीच देशात तिसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. कोरोनाची पहिली लाट वयोवृद्ध नागरिकांसाठी धोकादायक सिद्ध झाली, दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला फटका बसला. त्यामुळे तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असे अनेक रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. देशात तिसरी लाट कधी येणार याबाबत आताच निश्चित सांगता येत नाही, पण वेळीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटांपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते.
देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.