Covid-19 Third Wave : स्थिर झालेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह केरळ आणि दहा राज्याने देशाची चिंता वाढवली आहे. देशातील 50 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत. पुन्हा वाढणारी रुग्णसंख्या पाहून अनेकांना तिसरी लाट आली आहे का? असा प्रश्न पडला आहे. यावर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) महासंचालक डॉ. शेखर सी मांडे यांनी खुलासा केला आहे. कोरोना महामारीची तिसरी लाट येणार हे निश्चित आहे, पण ती कधी येईल याचा अंदाज बांधता येणार नाही, असे मांडे म्हणाले.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, डॉ. शेखर सी मांडे म्हणालेत की मास्क आणि लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेची तिव्रता कमी करता येऊ शकते. पण ती रोखता येणार आहे. केरळमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांचं विश्लेषण करत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट डेल्टा प्लस चिंतेचा विषय नाही. डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेने कोरोना महामारीची पुढील लाट पाहिली आहे. आपल्याला संरक्षित दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. पुढची लाट येण्याची शक्यता आहे, पण कसे आणि केव्हा ते अजून माहीत नाही.
कोरोना विषाणूचा नवीन म्यूटेंट आणि कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नाहीत, तर तिसरी लाट अधिक धोकादाय आणि वेगाने येईल, असे डॉ. शेखर सी मांडे म्हणाले आहेत. कोरोनाची लस प्रभावी ठरत आहे, त्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत. मास्क आणि लस तिसऱ्या लाटेविरोधात लढण्याचे शस्त्र मानले जात आहे. सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, आपण तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करु शकतो, असेही मांडी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.