Coronavirus : दोन महिन्यांनंतर भारतात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ, 'या' राज्यांनी वाढवलं देशाचं टेन्शन!

काही राज्यांमुळं संपूर्ण देशात कोरोनाची सरासरी वाढत आहे.
Corona Cases In India
Corona Cases In Indiaesakal
Updated on
Summary

काही राज्यांमुळं संपूर्ण देशात कोरोनाची सरासरी वाढत आहे.

जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीये. विशेषत: दक्षिण अमेरिकन देश आणि चीनमध्ये (China Coronavirus) संक्रमित लोकांची संख्या सातत्यानं वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाची प्रकरणं स्थिर आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांचा कल पाहिल्यास भारतातही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलंय.

गेल्या नऊ आठवड्यांमध्ये भारतात कोरोना संसर्गाची (Corona Cases In India) नवीन प्रकरणं दर आठवड्यात कमी होत असताना, गेल्या आठवड्यात (19 ते 25 डिसेंबर दरम्यान) कोरोना रुग्णांची संख्या देशात 11 टक्के वाढलीये. आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर 12 ते 18 डिसेंबर दरम्यान एका आठवड्यात देशात 1103 रुग्णांची नोंद झाली, तर 19 ते 25 डिसेंबर दरम्यान देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1219 वर पोहोचलीये.

Corona Cases In India
Coronavirus : कोरोनाला तोंड देण्यासाठी आपण किती तयार? जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी

'या' राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढले?

भारतात कोरोना रुग्णांची वाढ फार मोठी नाहीये. परंतु, काही राज्यांमुळं संपूर्ण देशात कोरोनाची सरासरी वाढत आहे. विशेषतः मध्य भारतातील महाराष्ट्र (Maharashtra), राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, दक्षिण भारतातील तेलंगणा आणि पूर्व भारतातील ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

Corona Cases In India
जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

इतर देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन सबवेरियंट BF.7 मुळं किंवा चीनमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या वाढत्या चाचण्यांमुळं कोरोनाची ही प्रकरणं वाढली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोरोना संसर्गामुळं मृत्यूची संख्या अजूनही खूपच कमी आहे. 19-25 डिसेंबर दरम्यान देशात 12 मृत्यू झाले आहेत, तर 12-18 डिसेंबर दरम्यान 20 मृत्यूची नोंद झालीये.

Corona Cases In India
Bharat Jodo Yatra : अखिलेश-मायावतींनी राहुल गांधींचं निमंत्रण नाकारलं; सपा-बसपाला कशाचं दिलं होतं निमंत्रण?

मागील आठवड्यातील आकडेवारीशी तुलना केली तर 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्याच वेळी, इतर नऊ राज्यांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या आठवड्याइतकीच राहिली आहे. ज्या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, त्यापैकी फक्त राजस्थान आणि पंजाब ही अशी आहेत, जिथं गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाधितांची संख्या 30 नं वाढलीये. तर, केरळमध्ये बाधितांची संख्या 31 नं कमी झालीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.