देशात जानेवारीत टोचली जाईल पहिली लस; आरोग्य मंत्र्यांची 'मन की बात'

 covid vaccination, health minister dr harsh vardhan, Corona, coronavirus
covid vaccination, health minister dr harsh vardhan, Corona, coronavirus
Updated on

India Coronavirus Vaccination : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांना कोरोनाविषयी दिलासा देणारी बातमी मिळणार आहे. जानेवारीमध्ये भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन  (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी व्यक्त केला आहे. प्रभावी लशीला प्राधान्य देणं ही सरकारची प्राथमिकता आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. 

ते म्हणाले की, कोरोना विरोधातील लढ्यासाठी उपयुक्त असलेल्या लसीकरण मोहिमेला देशात जानेवारीपासूनच सुरुवात होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे. आपतकाली वापरासाठी अर्ज केलेल्या कंपन्यांची लस जानेवारीच्या सुरुवातीला किंवा शेवटच्या टप्प्यात भारतीयांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. रिसर्चच्या बाबतीत भारत अन्य देशांपेक्षा कमी नाही. उपलब्ध करुन देण्यात येणारी लस ही सुरक्षित आणि प्रभावी असेल, याला सरकार प्राथमिकता देत आहे. या गोष्टीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

यापूर्वी शनिवारी देखील डॉ. हर्षवर्धन यांनी शास्त्रज्ञांनी लशीवर यशस्वी काम केल्याचे सांगत पुढील 6-7 महिन्यात जवळपास 30 कोटी नागरिकांना लशीचा डोस दिला जाईल, अशी माहिती दिली होती.  देशात सहा कंपन्यांच्या लशी क्लिनिकल ट्रायल स्टेजमध्ये आहेत. यात कोविशील्ड, को वॅक्सीन, जायकोव-डी, स्पुतनिक वी, एनवीएक्स-सीओवी 2373 आणि रीकम्बाइंड प्रोटीन एंटीजन बेस्ड लशीचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी सहा कंपन्यांचा दाखला दिला असला तरी दुसऱ्या बाजूला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी तीन कंपन्यांच्या लशी प्री क्लिनिकल स्टेजमध्ये असल्याचे म्हटले होते. त्यातील एक प्री डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले होते. लस अधिकृत करणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे. फायझर आणि बायोएनटेक लशीचे डोस ब्रिटनमध्ये देण्यात आले आहेत. मात्र त्याचे काही दुष्परिणाम आढळून येत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.