Corona JN.1 Virus: सावधान! कोरोना विषाणूचा JN.1 व्हेरीयंट 7 राज्यांमध्ये पसरला, 'या' राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्या

सात राज्यात आढळला JN.1 व्हेरीयंट आढळला असून नववर्षात रूग्णसंख्या झापाट्याने वाढण्याची भीती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाचं नववर्ष साजरं करणं महागात पडण्याची शक्यता आहे.
Corona JN.1 Variant
Corona JN.1 Variantesakal
Updated on

कोरोना व्हायरस JN.1 चे नवीन प्रकार भारतात झपाट्याने पसरू लागले आहे. देशात आतापर्यंत याची लागण झालेले ८३ रुग्ण आढळले आहेत. JN.1 चा सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे जेथे 34 प्रकरणे आढळून आली आहेत. कोविड नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करणारी संघटना INSACOG ने ही माहिती दिली आहे. गुजरात व्यतिरिक्त गोव्यात 18, कर्नाटकातील 8, महाराष्ट्रातील 7, केरळ आणि राजस्थानमधील प्रत्येकी 5, तामिळनाडूमधून 4 आणि तेलंगणातील 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच आठवड्यांमधील आणि 2020 ते 2022 पर्यंतच्या कोरोनाच्या ट्रेंडचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले आहे की, जानेवारी महिन्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ओमिक्रॉनमुळे डिसेंबर ते जानेवारीदरम्यान रोजच्या रुग्णांची संख्या वाढली होती.

Corona JN.1 Variant
JN.1 Covid : हिवाळा सुरू झाल्यावर का वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

येत्या चार आठवड्यांत देशात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आङे. इतकेच नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी INSACOG अहवालाच्या आधारे ही भीती व्यक्त केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना विषाणू JN.1 चे नवीन व्हेरीयंट आतापर्यंत सात राज्यांमध्ये आढळले आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये पहिले चार रुग्ण केरळ, कर्नाटक आणि गोव्यात आढळून आले होते, मात्र आता गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांव्यतिरिक्त ते राजस्थानमध्येही आढळले आहेत. मंगळवारी, जीनोम सिक्वेन्सिंगने राजस्थानमधील पाच रुग्णांमध्ये JN.1 व्हेरीयंटची पुष्टी केली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Corona JN.1 Variant
Corona JN.1 Virus: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आवाजही जाण्याची शक्यता, नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा

जानेवारीत आलेख वाढतो

अधिकाऱ्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यांमधील आणि 2020 ते 2022 पर्यंतच्या कोरोनाच्या ट्रेंडचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले आहे की, जानेवारी महिन्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे डिसेंबर ते जानेवारीदरम्यान दररोज रुग्णांची संख्या वाढली होती, मात्र फेब्रुवारी महिन्यात हा आलेख घसरण्यास सुरुवात झाली.

JN.1 व्हेरीयंट वेगाने पसरतोय

सध्या, JN.1 व्हेरीयंट वेगाने पसरत आहे, ज्याचे R मूल्य जास्त आहे म्हणजेच संसर्ग पसरण्याचा दर. अशा परिस्थितीत ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिसणारी वर्दळ आणखी तीन आठवडे राहण्याची भीती आहे. त्यानंतरच कोरोनाच्या ट्रेंडमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. त्याचबरोबर, अधिकारी असेही म्हणाले की, कोरोनाचा नवीन व्हेरीयंट किती काळ स्थिर राहू शकतो हे सांगता येत नाही.

Corona JN.1 Variant
JN.1 Covid 19 variant: JN.1 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आढळत आहेत 'ही' लक्षणे; तात्काळ करा डॉक्टरांना संपर्क

कर्नाटकात संसर्गामुळे तिघांचा मृत्यू झाला

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काल देशात कोरोनाचे 412 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 4 हजार 100 च्या पुढे गेला आहे. दरम्यान, कर्नाटकात कोरोना संसर्गामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 293 कोरोना रुग्णांनाही निरोगी घोषित करण्यात आले. सध्या देशात 4,170 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी 3,096 एकट्या केरळमध्ये आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गुजरातमध्ये JN.1 लागण जास्त लोक का आढळतात?

गुजरातमध्ये नवीन प्रकार आढळून येण्याचे कारण म्हणजे तेथे चाचणी वाढविण्यात आली आहे. केरळमध्ये कोविड-19 ची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत, परंतु आतापर्यंत JN.1 चे केवळ 5 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. INSACOG डेटा दर्शवितो की नवीन प्रकार JN.1 च्या प्रकरणांमध्ये डिसेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात वाढ झाली आहे. 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 29 नवीन प्रकरणे आढळून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.