मुंबई आणि दिल्लीतील (Mumbai and Delhi) काही भागांमध्ये वेगानं वाढत असलेल्या कोरोनाच्या केसेसच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टर आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या एका सदस्यानं चिंता व्यक्त केली आहे. सध्याचा ट्रेन्ड पाहता याला कोरोनाची तिसरी लाट म्हणता येईल असं त्यांनी म्हटलं आहे. (Covid third wave has started in clusters Mumbai Delhi says Maha Task Force member)
कोरोनाची दुप्पट रुग्णवाढ हे ओमिक्रॉनची लक्षणं दाखवतंय. पण गेल्या काही दिवसांपासून आढळून आलेल्या रुग्णांच्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालासाठी आम्ही थांबलो आहोत. यानंतर या संसर्गात ओमिक्रॉनचा वाटा किती आहे हे कळेल. सध्या हा संसर्ग ओमिक्रॉन आणि डेल्टाचं संयुक्तीकरण दिसतंय, असं डॉ. राहुल पंडीत यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.
डॉ. पंडीत हे कोविड १९ टास्कफोर्सचे सदस्य आहेत. ते म्हणाले, डॉक्टर म्हणून मी हेच सांगू इच्छितो की, लोकांनी कोरोनाचे नियम पाळायलाच हवेत. तसेच जर त्यांना कोरोनाची लक्षण असतील तर त्यांनी कुठलीही लाज न बाळगता आपली चाचणी करुन घेतली पाहिजे. जर कोरोनाच्या संसर्गामुळं आरोग्य व्यवस्थेत मोठा ताण यायला लागला तरच सरकारकडून लॉकडाऊन लावला जाईल, तोपर्यंत लॉकडाउन लागू होणार नाही. त्यामुळं लॉकडाउन टाळायचा असेल तर लोकांनी नियमांचं पालन करायलाच हवं, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
दरम्यान, अनेक जण विचारताहेत की रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यामागचा हेतू काय? त्यावर स्पष्टीकरण देताना डॉ. पंडीत म्हणाले, ही संचारबंदीला मोठं तार्किक महत्व आहे. सध्याच्या काळात लोकांनी खूपच सजग राहिलं पाहिजे हाच संदेश यातून दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.