Corona Virus : रविवारी कोरोनाचे ६५६ नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू

Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Updated on

नवी दिल्लीः देशामध्ये रविवारी कोरोनाच्या नवीन व्हायरसचे ६५६ रुग्ण आढळून आलेले आहेत. शनिवारच्या तुलनेमध्ये हा आकडा कमी असला तरी जेएन.१ या विषाणूमुळे भीतीचं सावट निर्माण झालं आहे.

नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. देशामध्ये आतापर्यंत ३ हजार ७४२ नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. शनिवारी ७५२ कोरोना रुग्ण आढळून आलेले होते. नवी दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. रविवारी एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाल्याची माहिती आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट करत चाचणी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय नवीन व्हायरसच्या बारकाव्यांबद्दल सतर्क राहण्याचं सूचवलं आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट (Covid New Variant) हा इतर व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नसून सध्या उपलब्ध असणारी कोविड लस ही या व्हेरियंटपासून आपला बचाव करण्यास सक्षम असल्याची माहिती WHO ने दिली आहे.

Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Video: शेवटी आईचं काळीज! रेल्वे अंगावरुन जात असताना शरिराची ढाल करत मुलांना वाचवलं

व्होकल कॉर्ड पॅरालिसिस

कोरोनामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे त्रास देऊ शकतो. यामुळे चव आणि गंध येण्यावर परिणाम होतो. मात्र, यासोबतच एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाचा संसर्ग घशातही होतो. यामुळे आवाजही जाण्याची शक्यता आहे. जर्नल पेडियाट्रिक्समध्ये Bilateral vocal cord paralysis requiring long term tracheostomy after SARS-CoV-2 infection या नावाने प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे केवळ चव आणि वासच नाही तर आवाज देखील नष्ट होऊ शकतो. याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस असे म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()