पुणे : महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, कोरोना लसींची निर्मिती बंद झाल्यानं डोसची मोठी कमतरता निर्माण झाली होती. पण आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटनं कोविशिल्ड लशीचं उत्पादन काही दिवसांपूर्वीच पुन्हा सुरु केलं आहे. याबाबत आता सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी मोठी माहिती दिली आहे. (Covishield Upadate Imp information given by Serum Institute Adar Poonawala)
पत्रकारांशी बोलताना पुनावाला म्हणाले, "आमच्याकडं सध्या ५ ते ६ मिलियन अर्थात ६० लाख कोविशिल्ड डोसचा स्टॉक तयार आहे. पण या डोसना सध्या रुग्णालयांकडून शून्य मागणी आहे. सध्याचा कोरोनाचा व्हेरियंट हा सौम्य असून त्याचं गंभीर परिणाम नाहीत. पण तरीही खबरदारी म्हणून ज्येष्ठ नागरिक बूस्टर डोस घेऊ शकतात"
दरम्यान, देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झालेली दिसून आली आहे. गेल्या चोवीस तसात ११,६९२ रुग्ण आढळून आले आहेत. काल १२,५९१ रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात सध्या ६६,१७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.