"कोविशिल्डपेक्षा कोवोव्हॅक्स बेस्ट"; सरकारचा बूस्टर डोससाठी विचार

नुकतीच जागतीक आरोग्य संघटनेनं कोवोव्हॅक्सला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal
Updated on

नवी दिल्ली : कोवोव्हॅक्स लसीला (Covovax vaccine) जागतीक आरोग्य संघटनेनं (WHO) भारतात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना आपत्कालिन वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, ही लस कोरोनावर ९० टक्के कार्यक्षम असल्याचं चाचण्यांमधून स्पष्ट झालं आहे. भारतातील कोविशिल्ड (Covishield) लसीपेक्षा कोवोव्हॅक्स खूपच चांगली लस असल्याचं सरकारी पॅनलनं म्हटलं आहे. त्यामुळं भारताचे टॉपचे सरकारी संशोधक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोवोव्हॅक्सची बूस्टर डोससाठी शिफारस केली आहे. (Covovax is better than Covishield the government is recommended for booster dose)

Corona Vaccination
सुकेशनं मला फसवलं, 'ईडी'च्या रडारवर असलेल्या जॅकलीनचा दावा

सरकारच्या जिनोम सिक्वेंसिंग मॉनिटरिंग एजन्सींपैकी (INSACOG) एक संचालक म्हणाले, "कोवोव्हॅक्स खूपच मजबूत रोगप्रतिकारशक्ती प्रदान करते तसेच ती चांगली सुरक्षा देणारी लस आहे."

Corona Vaccination
दूषित तेलाचा आरोग्यास धोका; काळजी घेण्याचे FDAचे आवाहन

कोवोव्हॅक्स ही नोवाव्हॅक्स आयएनसी (Novavax Inc) कंपनीनं तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची भारतीय आवृत्ती आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या फार्मा कंपनीला या लसीच्या उत्पादनाचा परवाना मिळाला आहे. ही एक पुनर्संयोजन प्रोटीन लस आहे जी स्पाइक प्रोटीन्स वापरून शरीराला नव्या कोरोना व्हेरियंट विरूद्ध प्रतिकारशक्ती कशी विकसित करावी हे शिकवते.

Corona Vaccination
मुंबईच्या माझगावातील हवा अतिशय प्रदूषित; दिल्लीलाही टाकलं मागे

अग्रवाल म्हणाले, कोवोव्हॅक्स लस बूस्टर डोस म्हणून कोविशिल्डपेक्षा खूपच कार्यक्षम आहे. तथापि, त्यांनी स्पष्ट केलं की, ओमिक्रॉनविरूद्ध नोव्हॉवॅक्स किती प्रतिकार प्रदान करते यावर पुढील क्लिनिकल अभ्यास गरजेचे ठरणार आहेत. आता तर WHO चं आपत्कालीन वापरासाठी दिलेली मंजुरी ही भारतासाठी चांगली बातमी आहे. त्यामुळं आता सरकारनं कोवोव्हॅक्सचा बुस्टर डोस म्हणून वापर करण्यासाठी खूप वेळ वायाला घालवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.