Monu Manesar: दोन मुस्लीम तरुणांना जिवंत जाळल्याप्रकरणी गोरक्षक मोनू मानेसरला अखेर अटक!

हरयाणातील नूंह इथं भडकलेल्या हिंसाचारातही मोनू मानेसर प्रमुख आरोपी आहे.
Monu Manesar
Monu Manesar
Updated on

चंदीगड : राजस्थानातील नासिर आणि जुनैद या दोन तरुणांना जिवंत जाळल्याप्रकरणी कथीत गोरक्षक मोनू मानेसर याला अखेर हरयाणा पोलिसांनी अटक केली आहे. सात महिन्यांनंतर मानेसरला अटक झाली आहे.

यानंतर त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं. दरम्यान, नूंह कोर्टानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हरयाणातील नूंह इथंल्या हिंसाचाराला मानेसरनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट कारणीभूत ठरली आहे. (Cow guard Monu Manesar finally arrested for murder of two Muslim youths in Rajsthan)

Monu Manesar
Mumbai Police Viral Post : गांजा हवाय का? डिलिव्हरी बॉयची ऑफर; तक्रारीनंतर पोलिसांच्या तत्परतेचे होतंय कौतुक

साध्या वेशात पोलिसांची कारवाई

आयएमटी मानेसर इथं हरयाणा पोलिसांच्या सीआयए स्टाफनं मंगळवारी मोनूला पकडलं. दुपारी सुमारे १२ वाजता साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी मोनूच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईचं एक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाला आहे. दरम्यान, गुरुग्राम पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी मोनू मानेसरला अटक केलेली नाही तर सीआयए स्टाफनं त्याला ताब्यात घेतलं.

Monu Manesar
Eknath Shinde: "ऋषी सुनक मला म्हणाले, HOW IS UT..." ; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खोचक उत्तर

आठ महिने फरार होता

स्वतःला गोरक्षक म्हणवून घेणारा मोनू मानेसर हा भिवानी जिल्ह्यात जिवंत जाळण्यात आलेल्या नासिर आणि जुनैद हत्याकांडांनंतर आठ महिने फरार होता. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी हरयाणाच्या भिवानीमध्ये बोलेरे इथं जळालेल्या अवस्थेत दोन मृतदेह मिळाले होते.

Monu Manesar
Jawan Controversy : शाहरुखचा 'जवान' अमिताभ यांच्या एका चित्रपटाची कॉपी? 'जवान'ची कथा चोरलेली?

अनेकांवर होते आरोप

तपासात समोर आलं होतं की, हे दोन्ही मृतदेह राजस्थानच्या गोपालगढमधील जुनैद आणि नासिर यांचे होते. हरयाणाच्या अनेक गोरक्षकांवर या दोन मुस्लिम तरुणांच्या हत्येचा आरोप होता. यांपैकी मोनू मानेसर ऊर्फ मोहित यादव यांच्यापैकी सर्वाधिक चर्चेत होता.

Monu Manesar
पाकिस्तानची भीती खरी ठरली! सौदी अरेबिया-भारताच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु

बजरंग दलाचा सदस्य

मोनू मानेसर हा बजरंग दलाचा सदस्य आणि गोरक्षक आहे. हरयाणातील गुरुग्राम इथल्या मानेसरचा तो रहिवासी आहे. बजरंग दलाच्या गाय संरक्षण टास्क फोर्स तसेच गोरक्षक दलाचा प्रमुख म्हणून ओळखला जातो.

३१ जुलै २०२३ मध्ये हरयाणातील नूंह इथं हिंसाचार भडकवल्याप्रकरणातही त्याचं नाव सामिल होतं. मोनू याच्यासह या हिंसाचारातील प्रमुख आरोपी बिट्टू बजरंगी याचा एक भडकाऊ व्हिडिओ देखील समोर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.