वाराणसी : ‘‘गाय ही आमच्यासाठी माता असून ती अनेकांसाठी पवित्र आहे. ज्यांना हे दुष्कृत्य वाटते त्यांना हे ठाऊक नाही की या देशातील कोट्यवधी लोकांची रोजीरोटी या गुराढोरांवर अवलंबून असते.’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज केले. ते वाराणसी येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते २ हजार ९५ कोटी रुपयांच्या २७ प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनसमारंभ देखील पार पडले. (BJP government)
राज्यात विधानसभा निवडणुकीचा (UP Assembly Election 2022) प्रचार शिगेला पोचला असताना पंतप्रधानांनी आज त्यांच्या मतदारसंघावर विविध विकासप्रकल्पांची अक्षरशः बरसात केली. गायी आणि म्हशींवर विनोद करणाऱ्यांचा समाचार घेताना पंतप्रधान म्हणाले की,‘‘ याच पशुधनावर देशातील कोट्यवधी लोकांची उपजीविका अवलंबून आहे. गाय आमची माता असून ती आम्हाला पवित्र आहे पण काहींना आम्हाला असे वाटणे हे देखील पाप वाटते.’’ समाजवादी पक्षावर निशाणा साधताना ते म्हणाले की, ‘‘ त्यांच्या शब्दकोशामध्ये ‘माफियावाद’ आणि ‘परिवारवाद’ हे शब्द आहेत पण आमचे प्राधान्य मात्र ‘सबका साथ, सबका विकास’ याला आहे.’’ पंतप्रधानांचा मागील दहा दिवसांतील हा वाराणसीचा दुसरा दौरा आहे. याआधी ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी येथे आले होते.
प्रकल्पांचा शुभारंभ
पंतप्रधानांचे आज सकाळीच येथे आगमन झाले. येथील फूड पार्कमध्ये त्यांच्या हस्ते दूध प्रकल्पाची पायाभरणी पार पडली. हा प्रकल्प तीस एकरवर पसरलेला असून त्याच्या उभारणीसाठी ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. येथे दररोज पाच लाख लिटर दुधावर प्रक्रिया होऊ शकेल. पंतप्रधानांच्या हस्तेच यावेळी या दूध प्रकल्पाशी संबंधित असलेल्या १ लाख ७ हजार उत्पादकांच्या खात्यावर ३५ कोटी रुपये जमा करण्यात आले. याशिवाय अन्य प्रकल्पांचे देखील त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.