कोरोना लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्टशी कसे लिंक करायचे?

आता लसीकरणाचे प्रमाणपत्र CoWIN पोर्टलवरून तुम्हाला तुमच्या पासपोर्टशी लिंक करता येणार आहे.
cowin
cowincowin
Updated on

औरंगाबाद: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येला जरी उतरती कळा लागली असली तरी तिसरी लाट धोकादायक ठरू शकते असं सांगतलं जात आहे. या काळात परदेशात शिक्षणसाठी किंवा इतर कामानिमित्त जाणाऱ्या प्रत्येकाला कोरोनाची लस बंधनकारक करण्यात आली आहे. लस घेतल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र (COVID-19 vaccination certificates) सोबत असणे गरजेचे आहे. तसचे ते प्रमाणपत्र तुमच्या पासपोर्टशीही जोडून घेतलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया की पासपोर्टला लसीकरणाचे प्रमाणपत्र कसं लिंक करायचे ते.

आता लसीकरणाचे प्रमाणपत्र CoWIN पोर्टलवरून तुम्हाला तुमच्या पासपोर्टशी लिंक करता येणार आहे.

लसीकरणाचे प्रमाणपत्र पासपोर्टशी लिंक कसं करायचे?

- पहिल्यांदा CoWIN च्या अधिकृत साईटवर क्लिक करा - www. cowin.gov.in.

- नंतर 'Raise an issue' या ऑप्शनवर क्लिक करा.

- त्यानंतर 'Passport' ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ज्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्याचे नाव शोधा.

- त्यानंतर तुमचा पासपोर्ट नंबर टाका.

- त्यानंतर सविस्तर माहिती भरा.

cowin
OBC Reservation: खासदार कराड, आमदार सावे आणि केणेकरांना अटक

जर पासपोर्ट आणि कोरोना लसीकरण प्रमाणपत्रातील तपशील जुळत नसतील तर तिथे एडीटचाही ऑप्शन देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया तुमची माहिती कशी एडीट करायची.

Co-WIN पोर्टलवरी माहिती कशी एडीट करायची?

-www. cowin.gov.in. या लिंकवर जा.

- त्यानंतर 'Raise an issue' या ऑप्शनवर क्लिक करा.

- नंतर 'Correction in certificate' यावर क्लिक करा.

- त्यानंतर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर ते करा.

- त्यानंतर 'Submit' या ऑप्शनवर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.