CoWIN Data Leak: धक्कादायक! Cowin पोर्टलवरून डेटा लीक? करोडो लोकांची खाजगी माहिती टेलिग्रामवर

डेटा लीक झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
CoWIN Data Leak
CoWIN Data LeakSakal
Updated on

CoWIN Data Leak: डेटा लीक झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि पॅन कार्डचा तपशील टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचा दावा सोमवारी करण्यात आला.

मलयाला मनोरमाच्या अहवालानुसार, डेटा लीक कोविड लसीकरण पोर्टल कोविन वरून झाला आहे, ज्यामध्ये लोकांनी त्यांचे वैयक्तिक तपशील दिले होते.

अहवालानुसार, जेव्हा कोविन पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक प्रविष्ट केला जातो, तेव्हा टेलीग्राम बॉट लसीकरणासाठी वापरला जाणारा ओळखपत्र क्रमांक लिंग, डीओबी आणि लसीकरण केंद्राचे नाव दिसते.

या डेटा ब्रीचमुळे, टेलीग्रामवर भारतीय नागरिकांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड क्रमांक उपलब्ध आहेत. जेव्हा लसीचे डोस उपलब्ध होते, तेव्हा लोक एकाच मोबाइल नंबरसह अनेक कुटुंबातील सदस्यांसाठी स्लॉट बुक करायचे.

रिपोर्टनुसार, जर अनेक लोकांनी टाकलेल्या मोबाईल नंबरवर नोंदणी केली असेल, तर टेलिग्राम बॉट त्या सर्वांची माहिती एकाच वेळी दाखवत आहे.

CoWIN Data Leak
Success Story: एकेकाळच्या वेटर आज चालवतायत 2 लाख कोटींची कंपनी, असा आहे भारतीय वंशाच्या CEOचा प्रवास

मल्याळम डेलीच्या वृत्तानुसार, लीक झालेल्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांचाही समावेश आहे. कोवीन पोर्टलवर वन टाईम पासवर्ड ओटीपी सुविधाही देण्यात आली होती.

आतापर्यंत हे कळले नाही की टेलिग्रामवर डेटा कसा लीक झाला? 2021 मध्ये, अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की भारतातील लस नोंदणी पोर्टल कोविन हॅक केले गेले होते आणि 150 दशलक्ष लोकांचा डेटाबेस विक्रीसाठी होता. अनेक सायबर सुरक्षा संशोधकांनी हा दावा नाकारला आणि त्यामागील वेबसाइट बनावट असल्याचे म्हटले होते.

CoWIN Data Leak
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.