CoWIN Data Leak: "CoWINनं जन्मतारीख, पत्त्यांची माहिती घेतलेली नाही"; सरकारी सुत्रांचं स्पष्टीकरण

कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी दिलेला आपला वैयक्तिक डेटा लीक झाल्याच्या वृत्तानं देशभरात खळबळ उडाली आहे.
CoWIN Data Leak
CoWIN Data LeakSakal
Updated on

नवी दिल्ली : कोविड लसीकरण नोंदणी पोर्टल CoWINनं नागरिकांचा कुठलाही वैयक्तिक डेटा गोळा केलेला नाही, जसं जन्मतारीख आणि पत्ता! सरकारच्या सुत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. पण या वादानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं की, "हा जुना डेटा असून आम्ही सध्या या डेटाची खातरजमा करत आहोत.

याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे" पण आता डेटा लीक झाला नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे. (CoWIN did not collect date of birth address Govt source explanation on data leak issue)

CoWIN Data Leak
CoWIN Data Leak: डेटा लीक प्रकरणावर सरकारचं अजब स्पष्टीकरण! म्हटलं, तो डेटा...

विरोधीपक्षांच्या नेत्यांनी कोविन पोर्टलवरील डेटा लीकचं प्रकरण समोर आणलं होतं. तसेच हा खूप मोठा प्रायव्हसी भेदल्याचं या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यांनी दावा केला होता की, कोविन पोर्टलवरुन ज्या लोकांनी कोविडचं लसीकरण केलं त्या लोकांचे मोबाईल फोन क्रमांक, आधार क्रमांक, पासपोर्ट नंबर्स, मतदार ओळखपत्र आणि कौटुंबिक तपशीलाची माहिती लीक झाली आहे. ही माहिती पोर्लटलवर मोफत उपलब्ध आहे. (Marathi Tajya Batmya)

CoWIN Data Leak
CoWIN Data Leak: डेटा लीक प्रकरणावर सरकारचं अजब स्पष्टीकरण! म्हटलं, तो डेटा...

सरकारी सुत्रांनी असंही सांगितलं की, ज्या नागरिकांनी एक डोस, दोन डोस आणि बुस्टर डोस घेतले त्यांच्या तारखाच केवळ कोविन पोर्टलनं घेतल्या आहेत. याच्या सविस्तर अहवालावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

CoWIN Data Leak
JP Nadda : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अकोला दौरा रद्द; उपमुख्यमंत्री घेणार सभा; कारण...

विरोधकांनी काय आरोप केला आहे?

तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटरवर थ्रेड स्वरुपात कोविनवरुन डेटा लीक झाल्याचा दावा केला होता. या डेटामध्ये राज्यसभेचे खासदार, तृणमुलचे नेते दारेक ओबेरिअन, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची माहिती सार्वजनिकरित्या इंटरनेटवर उपलब्ध आहे. यामध्ये त्यांनी काही पत्रकारांची वैयक्तिक माहिती देखील ऑनलाईन उपलब्ध असल्याचं गोखले यांनी म्हटलं होतं.

हा सर्व डेटा कोविड लसीकरणासाठी कोविन पोर्टलनं घेतलेला डेटा असून तो लीक झाल्यानं ऑनलाईन सहज उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला होता. या डेटा लीकबाबत खासदार सुप्रीया सुळे यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत याबाबत काळजी व्यक्त करत हे अस्विकारार्ह असल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.