देशात 1 मे पासून कोरोनावरील लसीकरणाचा (corona vaccination) तिसरा टप्पा सुरु झाला. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वर्षांच्या नागरिकांना लस देण्यात येत असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. अशातच ठिकठिकाणी कोविन पोर्टलवर (CoWin Portal) नोंदणी करण्यास ठिकठिकाणी सुरुवात झाली. या लस साठी नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन (vaccine registartion) करणे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? कोविन पोर्टल वर एक खास नवीन फीचर (new feature) जोडण्यात आले आहे. आणि सोबतच एक सिक्युरिटी कोड (security code) आवश्यक करण्यात आला आहे. नेमका काय आहे हा बदल जाणून घेऊ..
काय आहे खास फिचर?
दरम्यान काही युजर्संकडून आलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)ने माहिती दिली आहे की, पोर्टलवर वॅक्सिनेशन सर्टिफिकेट (Vaccination Certificate) जनरेट होत आहे. आणि यासाठी आता युजर्संना एक सिक्योरिटी कोड पाठवले जात आहे. या कोडशिवाय कोविन पोर्टलवरून लस घेणाऱ्यांची नोंदणी करणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लस घेतेवेळी हा कोड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अशा तक्रारीनंतर कोविन पोर्टलला एक नवीन फीचर जोडले आहे. आता वॅक्सिनेशन केंद्रावर लस लावण्यासाठी जाताना हा चार आकडी कोड विचारला जाईल. त्यानंतर तो कोड त्या ठिकाणी सबमिट केला जाईल. त्यानंतर लसीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
काही दिवसांपूर्वी वेबसाईट हॅक
1 मे पासून कोरोनावरील लसीकरणाचा तिसरा टप्पा झाल्याने यात 18 ते 44 वर्षांच्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वा कोविन ॲपच्या सर्व्हरला अडचणी निर्माण झाल्या असून आला वेबसाईट काही वेळ क्रॅश देखील झाली होती. काही वेळा ॲप आणि पोर्टलवर मोबाईल नंबर नोंदणी केल्यानंतर ओटीपी येण्यात देखील अडचण येत होती.
लसीसाठी अशी करा नोंदणी
सर्वात आधी ब्राउजर मध्ये जाऊन cowin.gov.in वेबसाइट ओपन करा. त्यानंतर स्क्रीनवर वरच्या बाजुला Register/Sign In yourself लिहिलेले दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करा. यानंतर Register or SignIn for Vaccination च्या खाली आपला दहा अंकी मोबाइल नंबर टाइप करा. आता यानंतर एक ओटीपी येईल. त्याला enter करा. ओळखपत्रांची माहिती त्यात भरा. लस घेताना ते सोबत घेऊन जाणे आवश्यक असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.