Sitaram Yechury: CPM चे नेते सिताराम येचुरी यांची तब्येत बिघडली; दिल्ली एम्सच्या ICU मध्ये दाखल

Sitaram Yechury admitted to Delhi AIIMS: त्यांना लंग्स इन्फेक्शन झालं आहे. अचानक तब्यत बिघडल्याने त्यांना आपातकालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, पण त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
Sitaram Yechury
Sitaram Yechury
Updated on

नवी दिल्ली- सीपीएमचे नेता सीताराम येचुरी यांची तब्येत सोमवारी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांनी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, त्यांना लंग्स इन्फेक्शन झालं आहे. अचानक तब्यत बिघडल्याने त्यांना आपातकालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, पण त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सिताराम येचुरी यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टर त्यांच्या स्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारतीय राजकारणातील सिताराम येचूरी हे प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) महासचिव आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.