बंगळुरु- चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे (Tauktae Storm) संकट (Disaster) घोंघावत आहे. अशात कर्नाटकच्या कौप किनाऱ्यावर एक बोट अडकली असून त्यात 9 क्रू मेंबर असल्याची माहिती मिळत आहे. बोट समुद्रातील खडकाळ भागात अडकली आहे. उडपी जिल्ह्यातील कौप किनाऱ्यालगतची ही घटना आहे. क्रू मेंबर्संनी मदतीची हाक दिली असून लवकरात लवकर एअरलिफ्ट करुन त्यांना तेथून काढण्याचं आव्हान केलंय. लवकर त्यांना एअरलिफ्ट केलं नाही, तर बोट बुडण्याचा धोका त्यांनी व्यक्त केलाय. एका क्रू मेंबरने मदतीचे आव्हान करणारा व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओतून सर्व क्रू मेंबर्स मोठ्या संकटात अडकल्याचं स्पष्ट दिसत आहे. (Crew members of a boat stranded coast of Kaup Udupi Karnataka cyclonetaukate)
देवभूमी केरळलाही (Kerala) वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणांवर विजेचे खांब आणि झाडे रस्त्यांवर उन्मळून पडल्याने जनजीवन (Public Life) पूर्णपणे ठप्प झाले आहे. कर्नाटकमध्येही या चक्रीवादळाचे परिणाम दिसून आले आहेत. समुद्रामध्ये मोठ-मोठ्या लाटा उसळत असून नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्नाटलमध्ये चार लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.