Crime:'जर आवाज केला तर परत..'महिला घरी एकटी असताना पडला दरोडा, दरोडेखोरांकडून महिलेवर सामुहिक अत्याचार

महिला घरी एकटी असताना ५ ते ६ जणांच्या टोळीने घरावर दरोडा टाकला, त्यानंतर दरोडेखोरांनी महिलेला गुंगीचं औषध पाजून तिच्यावर सामुहिक अत्याचार केला.
Crime:'जर आवाज केला तर परत..'महिला घरी एकटी असताना पडला दरोडा, दरोडेखोरांकडून महिलेवर सामुहिक अत्याचार
Updated on

UP Crime against Woman: उत्तरप्रदेशच्या बिजनोरमधील एक धक्कायदायक घटना समोर आली आहे. बिजनोरच्या नगीना गावात दरोडा आणि सामूहिक बलात्काराच्या लाजिरवाण्या घटनेने सगळेच थक्क झाले. यावेळी नराधमांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पीडितेच्या शरीरावर सिगारेटचे चटके देण्यात आले होते. आवाज काढल्यास पुन्हा अत्याचार करू, अशी धमकी त्याने दिल्याने ती महिला बेशुद्ध झाली. या घटनेनंतर महिला घाबरली असून या भीषण घटनेच्या धक्क्यातून ती सावरलेली नाही.

नगीना गावात एका घरात चोरट्यांनी गोंधळ घातला. पाच ते सहा हल्लेखोरांनी शेजाऱ्याच्या गच्चीवरून घरात घुसून पत्नीला मारहाण केली आणि गुंगीचं औषध पाजून तिला बेशुद्ध केले. याबाबत 'लाईव्ह हिंदुस्तान'ने वृत्त प्रकाशित केले आहे.

काही वेळाने महिलेला शुद्ध आल्यावर चोरट्यांनी तिला बांधून सिगारेट ओढण्यास सुरुवात केली. यादरम्यान चोरट्यांनी महिलेच्या शरीरावर सिगारेटने चटके दिले. या घृणास्पद घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण गाव हादरले आहे. दाट लोकवस्तीत चोरट्यांनी ही घटना कशी घडवून आणली, याबाबत ग्रामस्थ अवाक् झाले आहेत.

हे कुटुंब धामापूर येथे नातेवाईकाच्या घरी थांबले होते.पीडित महिलेचा पती, मूल व सासू यांना औषध घ्यायला उशीर झाल्याने ते धामापूर येथे राहणाऱ्या पतीच्या लहान भावाच्या घरी थांबले होते. बुधवारी सकाळी ते घरी परतले आणि त्यांनी पोलिसांना दरोड्याची माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पीडितेचा पती, मुले आणि सासू घरातून बाहेर पडले होते. चोरट्यांनी घरात घुसून दरोडा टाकून सामूहिक बलात्कार केला आणि रात्री 10.30 वाजण्यापूर्वी तेथून निघून गेले.(Latest Marathi News)

Crime:'जर आवाज केला तर परत..'महिला घरी एकटी असताना पडला दरोडा, दरोडेखोरांकडून महिलेवर सामुहिक अत्याचार
Manoj Jarange: पहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत मनोज जरांगेंनी घेतली सभा; बोलताना म्हणाले 'तुमचे ऋण...'

महिनाभरापूर्वीही पीडित कुटुंबाला लुटण्यात आले होते

पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, 19 ऑक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून 80 हजार रुपये लुटले होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार करूनही पोलीस ठाणे अंमलदारांनी यांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट परिसरात गस्त वाढवू, असे सांगून विषय मिटवला. (Latest Marathi News)

Crime:'जर आवाज केला तर परत..'महिला घरी एकटी असताना पडला दरोडा, दरोडेखोरांकडून महिलेवर सामुहिक अत्याचार
Buldhana Accident News: भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात; ऐन भाऊबीजेच्या दिवशी 3 तरुणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.