UP : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बापाला जन्मठेपेची शिक्षा

याप्रकरणी आरोपीला 53 हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे
Crime News up
Crime News upesakal
Updated on
Summary

याप्रकरणी आरोपीला 53 हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या वडिलांना न्यायालयाने 14 दिवसांत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विशेष (पोक्सो कायदा I) अवधेश कुमार यांच्या न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.

याप्रकरणी आरोपीला 53 हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. या घटनेत पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असून या प्रकरणात दंडाची अर्धी रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. अटक झाल्यापासून मुलीचे दोषी वडील तुरुंगात आहेत.

Crime News up
मविआ सरकार अल्पमतात त्यामुळं शिवसेनेनं गुंडगिरी थांबवावी - आठवले

अधिकची माहिती अशी की, डिडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बापाने आपल्या मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. बापाने मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर केले असल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणातील आरोपी व्यक्ती वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होता. पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. जेव्हा घरातील सदस्य घराबाहेर असतात तेव्हाच तो आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पिडीतीने तक्रारीत सांगितले होते.

पिडीता गरोदर राहिली आणि 11 जून रोजी तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर नातेवाइकांनी मुलीला रुग्नालयात दाखल असता ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. अहवाल समोर आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. दरम्यान, पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे अवघ्या १४ दिवसांच्या मर्यादित कालावधीत अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला आहे.

Crime News up
'MLA केसरकर 3 पक्षाचे झाले नाहीत, शिंदे गटाचे तरी काय होणार?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.