Badaun Double Murder: उत्तर प्रदेशातील बदायूं येथे दोन मुलांची हत्या करणाऱ्या साजिदला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या चकमकीत आरोपी ठार झाला. साजिदच्या हातातून वाचलेल्या मुलाने सांगितले की, घटनेच्या वेळी साजिद आणि जावेद हे दोन आरोपी तिथे उपस्थित होते. त्याने सांगितले की, साजिदने आधी मोठ्या भावाकडून चहा आणि नंतर लहान भावाकडून पाणी मागवले होते.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना मुलाने सांगितले की, जेव्हा मी वरती गेलो तेव्हा साजिदने माझे तोंड धरले आणि नंतर त्याने माझ्यावर वार केला, त्यामुळे मला दुखापत झाली. मग मी त्याला ढकलून खाली पळालो आणि आईसोबत बाहेर आलो आणि दरवाजा बंद केला.
घटनेचा साक्षीदार असलेल्या मृताच्या भावाने सांगितले की, घटनेच्या वेळी साजिद आणि जावेद दोघेही तिथे उपस्थित होते. साजिदने माझ्या मोठ्या भावाकडून चहा आणि लहान भावाला पाणी आणण्यास सांगितले. जेव्हा मोठा भाऊ चहा घेऊन आला तेव्हा त्याला मारण्यात आले आणि नंतर लहान भाऊ आल्यावर त्यालाही मारण्यात आले. माझा धाकटा भाऊ ओरडला मग मी वर गेलो.
मुलाने पुढे सांगितले की, मी टेरेसवर गेलो तेव्हा त्याने दोन्ही भावांना मारले होते आणि ते गेट बंद करत होते. मला पाहताच त्याने मलाही मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मी त्याला ढकलून पळून गेलो.
मुलांची आई संगीता म्हणाली, "मी माझ्या घरात कॉस्मेटिकचे दुकान चालवते आणि वर माझे पार्लरचे दुकान आहे. संध्याकाळी साजिद घरी आला आणि त्याने आधी क्लचर्स मागितले, त्यानंतर काही वेळाने, त्याने 5000 रुपयांची मदत मागितली. मी माझ्या पतीशी बोलून त्याला 5000 रुपये दिले. त्यानंतर त्याची तब्येत बरी नसल्याचे सांगून तो घरच्या गच्चीवर गेला. आयुष आणि युवराज ही दोन्ही मुलं गच्चीवर होती. मुलांच्या आजीने सांगितले की, साजिदने हनीला पाणी घेऊन वरती बोलावले होते. हनी पाणी घेऊन वरती गेला होता आणि काही वेळाने किंचाळण्याचे आवाज येऊ लागले आणि साजिद हातात मोठा चाकू होता. तो रक्ताने माखला होता तसाच साजिद खाली येत होता.
मुलांच्या आजीने सांगितले की, सायंकाळी उशिरा सलूनचे दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीने घरात घुसून आयुष, युवराज आणि आहान उर्फ हनी या तीन मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. ज्यामध्ये आयुष (12) आणि अहान (6) यांचा मृत्यू झाला आहे, तर युवराजला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. या घटनेने संतप्त कुटुंबीय व ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला. आरोपी साजिदच्या दुकानाला आग लावली आणि त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. एसएसपीसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि गर्दीवर नियंत्रण मिळवले.
बरेली झोनचे आयजी राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, दोन मुलांच्या निर्घृण हत्येप्रकरणी रक्ताने माखलेला आरोपी साजिद घटनास्थळावरून पळून गेला. त्याची माहिती मिळताच आमच्या पथकाने त्याचा पाठलाग केला असता तो शेकुपूरच्या जंगलात दिसला. आमची एसओजी आणि पोलिस स्टेशन त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी होऊन मरण पावला.
आयजीच्या म्हणण्यानुसार या घटनेत साजिद हा एकमेव आरोपी होता. एक व्यक्ती रक्ताने माखलेला पळत असल्याचे लोकांनी सांगितल्यावर त्याचा पाठलाग करण्यात आला. या घटनेमागची कारणे शोधली जात असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्यवहार आहे की आणखी काही वैमनस्य आहे, याचा कसून तपास सुरू आहे. त्याने सांगितले की, सध्या कुटुंब दु:खी आहे त्यामुळे ते त्याच्याशी जास्त बोलत नाहीत.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी घरात जाऊन प्रथम मुलांच्या आजीला भेटले आणि नंतर दुसऱ्या मजल्यावर जाऊन तीन मुलांवर हल्ला केला, यात दोन मुलांचा मृत्यू झाला आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला. या चकमकीत सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे प्रभारी गौरव बिश्नोई यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन्ही मुलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फरार आरोपीचा पोलिसांना पाठलाग केला. त्यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. यात आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बरेलीचे आयजी राकेश कुमार यांनी यासंदर्भात सांगितलं की, घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली होती. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने गोळीबार सुरु केला. कारवाईमध्ये आरोपीचा मृत्यू झालाय. आरोपी २५ ते ३० वर्षे वयाचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.