Crime News : प्रत्येक प्रेमकथेचा शेवट गोड होतो असे नाही. अनेक प्रेमकथा भयानक असतात, त्याचा शेवट देखील भितीदायक असतो. अनेक युवकांनी प्रेमासाठी गुन्हा केल्याचे समोर आले आहे. मात्र एक विचित्र घचना छत्तीसगडमधील कोरबा येथे घडली. ही घटना वाचून पोलिसही शॉक झाले. आरोपीने जबाबात असे काही सांगितले की पोलिसांचा पायाखालची जमीन सरकली. (boyfriend killed girlfriend in chhattisgarh)
एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. पण मुलाने तिच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा गळा दाबून तिची हत्या केली. पण मृत्यूनंतरही मुलीने मुलाचा पाठलाग सोडला नाही. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया.
छत्तीसगडमधील कोरबा येथे २४ वर्षीय मुलगी ८ महिने झाली बेपत्ता होती. तिच्या बॉयफ्रेंडने तिची हत्या केली होती. गोपाल खाडिया, असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे.
आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपी गोपालने गर्लफ्रेंडचा मृतदेह २० फूट खड्डा करुन पुरला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांना मृतदेह सापडला आणि आरोपीलाही पकडले. मात्र यादरम्यान आरोपीने धक्कादायक खुलासा केला.
पोलिसांनी गोपाल खाडिया याला ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला. आरोपीने गुन्हा कबूल केला. तसेच तो ८ महिने झाले तो भीतीत जगत आहे. कारण त्याच्या मैत्रिणीचे भूत त्याला रात्रंदिवस त्रास देत असून त्याला शांतपणे जगू देत नाही, असा खुलासा गोपालने केला.
आपला गुन्हा लपविण्यासाठी त्याने आपल्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह पुरल्याची कबुलीही आरोपीने दिली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला. मृतदेहा सांगडा पाहून मुलीच्या आईने हंबरडा फोडला आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
गोपालने पोलिसांना जबाबात सांगितले की तो वीटभट्टीवर ट्रक चालक म्हणून काम करत असे. पीडित मुलगी देखील तिथेच भट्टीत विटा भरण्याचे काम करायची. यादरम्यान दोघांची भेट झाली. दोघेही एकमेकांशी बोलत राहिले आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
दोघेही गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र मुलीने लग्नासाठी तकादा लावला. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली आणि त्यामुळे त्रस्त होऊन गोपालने अंजूला आयुष्यातून हटवण्याचा प्लॅन आखला आणि तिचा गळा दाबून खून केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.